जगाला कळतंय, पण राहूल गांधींना काही वळेना

विशेष प्रतिनिधी 
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांचे जगभरातून कौतुक होत आहे. मात्र, राहूल गांधींना मात्र समजत नाही अशी टीका नेटीझन्सकडून केली जात आहे.  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी करोना विषाणू भारतात फैलावत चालल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारनं योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही, असा आरोपही केला. सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. राहुल गांधींच्या या ट्विटवरून सोशल मीडियातून टीका होतेय.

त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, राहुल गांधींना ‘कार्टुन चॅनल पाहणं सोडून न्यूज चॅनल पाहत चला. संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अ‍ॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आलीय. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच करोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा  यावर म्हणतात, राहुल गांधी एकमेव असे व्यक्ती आहेत ज्यांना भारतात करोना रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न दिसत नाहीत. तुमच्याच सहकाºयांना विचारा की भारत सरकार करोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी किती काम करत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसंदेचे कामकाज थांबविण्याची मागणी करणाºया खासदारांना खडे बोलही पंतप्रधानांनी खडे बोल सुनावले होते. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये. अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. खासदारांनीही या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय हवाई दल  आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. ते कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार केला पाहिजे. तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची ही वेळ आहे. अशा वेळी जरआपण कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल, असा सवाल त्यांनी केला होता.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात