Supriya Sule : 2 ठाकरे – फडणवीसांचे आभार मानले, पण औरंगजेबाच्या कबरीवर झुकणाऱ्या ओवैसींवर बोलायचे टाळले!!

प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार जरूर मानले, पण आपली राजकीय सोय बघत औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्या असदुद्दीन ओवैसींवर बोलायचे टाळले. 2 Thackeray – thanked Fadnavis, but refrained from talking on Owaisi who was leaning on Aurangzeb’s grave

नाशिक दौऱ्यात सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. केतकी चितळे या अभिनेत्रीने शरद पवारांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. आहे तिला अटकही झाली आहे. तिची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे.



याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची संस्कृती इतक्या खालच्या दर्जाची नाही. कोणाच्या वडिलांच्या मरणाची वाट बघणे योग्य नाही. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानते. कारण त्यांनी केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध केला आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे त्या म्हणाल्या.

एआयएमआयएमचे हैदराबाद मधले आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगर मध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर वाहिली. त्याच्यापुढे ते झुकले, या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांनी चपखलपणे त्या मुद्द्यावर बोलायचे टाळत महागाईवर बोलायला सुरुवात केली. मी त्या मुद्द्याचा फारसा विचारच करत करत नाही. त्याच्यापेक्षा महागाई, जनतेचे प्रश्न, माझ्या मतदारसंघातले प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात, असे सांगून सुप्रिया सुळे यांनी सुषमा स्वराज यांचे उदाहरण दिले.

आकडों से पेट नही भरता उसके लिये धान लगता है, असे सुषमा स्वराज यांनी त्यावेळचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना लोकसभेत सुनावले होते. याची आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली.

2 Thackeray – thanked Fadnavis, but refrained from talking on Owaisi who was leaning on Aurangzeb’s grave

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात