प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूरकरांचा विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय ठाकरे – पवार सरकारने घेतला आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील ७२५० हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यासाठी लाकडी – निंबोडी उपसा सिंचन योजनेला ठाकरे – पवार सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. Water from Ujani dam to Baramati-Indapur, protesting against Solapurkars
दत्तामामा भरणे सोलापूरचे पालकमंत्री आहेत पण प्रत्यक्षात इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सोलापूरवर अन्याय करत बारामती आणि स्वत:च्या इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उजनीचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दत्तामामा भरणे त्यांनी गेल्या वर्षी बारामती आणि इंदापूर तालुक्यांसाठी साठी लाकडी – निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न चालविला असता त्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय आमदारांनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या योजनेचा प्रस्ताव रद्द केला होता. उजनी धरणातील मूळ पाणी आराखड्याला हात न लावता तेथील सांडपाणी नेण्याचे नियोजन असल्याचा खुलासा त्यावेळी भरणे यांनी केला होता. परंतु तो खुलासा निराधार आधारित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
लाकडी – निंबोडी उपसा सिंचन योजनेस सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही माहिती स्वत: पालकमंत्री भरणे यांनी दिली आहे.
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उद्भव उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून असून पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलले जाणार आहे. यातून इंदापूर तालुक्यात 10 गावांतील ४३३७ हेक्टर आणि बारामती तालुक्यात ७ गावांतील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या योजनेतून ०.९० अब्ज घन फूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे.
इंदापूर आणि बारामतीच्या दुष्काळी भागात उजनी धरणातून पाणी नेताना सोलापूरवर अन्याय होणार नाही. लाकडी – निंबोडी योजनेसाठी उजनीतून पाणी नेणे हे नियोजितच आहे. यात पाणी पळविण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. सोलापूरकरांनी गैरसमज करून घेऊ नये, असे वक्तव्य दत्तामाभा भरणे यांनी करून सोलापूरकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App