वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञान वापी मशिदीच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणास तात्काळ स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. Supreme Court refuses to suspend videography survey; Shock to the Muslim party!
अंजुमन ए इंतेजामिया मस्जिद प्रबंधन समितीने सुप्रीम कोर्टात ज्ञानवापी मशिदीच्या व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाला स्थगित करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांच्या खंडपीठाने स्थगिती द्यायला नकार दिला आहे. सीनियर एडवोकेट हुजेफा अहमदी यांनी या प्रकरणावर तत्काळ सुनावणीची मागणी केली. वाराणसी कोर्टाच्या आदेशामुळे व्हिडिओग्राफी तात्काळ सुरू होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घेऊन व्हिडीओग्राफी सर्वेक्षणाला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
Supreme Court On NOTA : सुप्रीम कोर्टाने विचारले, NOTAची संख्या जास्त असल्यास निवडणूक रद्द करावी का?
परंतु सुप्रीम कोर्टाला ही केस नेमकी माहिती नाही. त्याची कागदपत्रे बघितली नाहीत. एकदम कसा काय स्थगितीचा निर्णय देता येईल?, असे सांगत सरन्यायाधीश रामन्ना यांच्या खंडपीठाने मुस्लिम पक्षाची मागणी फेटाळून लावली. अर्थात या प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यायला देखील सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे.
त्यामुळे आता वाराणसी कोर्टाने नेमलेल्या तीन वकील कमिशनर यांच्या देखरेखीखाली ज्ञानवापी मशिद आणि मशिदी तले तळघर यांची व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्ट कमिश्नर अजय मिश्रा, विशाल कुमार सिंह आणि अजय सिंह यांच्या हजेरीत व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षणाचा रिपोर्ट 17 मेपर्यंत सोपविण्याचा वाराणसी कोर्टाचा आदेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App