प्रतिनिधी
मुंबई : “पाय ठेवू देणार नाही”… राज ठाकरे यांना आणि अनुराग ठाकूर यांना…!! पण कुठे…?? आणि कोण…?? राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या आंदोलनाची घोषणा करतानाच 5 जून चा अयोध्या दौरा देखील जाहीर केला आहे. परंतु आता उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यातले भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी गर्जना केली आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या आंदोलनात ठाकरे कुटुंबियांचे काहीही योगदान नाही. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या विरोधात नेहमी बोललेले आहेत. त्यांनी हात जोडून माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा दावा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी वेगवेगळी ट्विट करून केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. Raj Thackeray while announcing the agitation to remove the horns on the mosques
एकीकडे राज ठाकरे आणि महाराष्ट्र भाजप यांची “मिलीभगत” आहे, असा आरोप राज ठाकरे यांचे विरोधक करत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या उत्तर प्रदेश मधल्या खासदाराने त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली आहे. यातल्या विसंगतीवर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
एकीकडे राज ठाकरेंवर असा वाद रंगत असताना दुसरीकडे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील पाऊल ठेवू देणार नाही, अशी धमकी मिळाली आहे. ही धमकी पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. जेएनयु मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात वक्तव्य करताना अनुराग ठाकूर यांनी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. त्याचा निषेध म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करणार नाही. त्यांच्या आगमनाला विरोध करू, असे काही विद्यार्थ्यांच्या संघटनांनी जाहीर केले आहे.
राज ठाकरे यांना यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदाराचा विरोध आहे, तर अनुराग ठाकूर यांच्या फिल्म इन्स्टिट्यूट दौऱ्याला इन्स्टिट्यूटमधील “उच्चशिक्षित” विद्यार्थ्यांचा विरोध आहे… पण त्यावर मोठी घुसळण झाल्यानंतर दोन्ही दौरे यथावकाश होणार आहेत…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App