Raj Thackeray : मनसेच्या भोंगे आंदोलनाला यश; शिवसेना – काँग्रेसची पोटदुखी; मराठी माध्यमांचीही “चालूगिरी”!!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगे विरोधी आंदोलन केल्यानंतर त्याला अभूतपूर्व यश मिळाले. मशिदींवरचे भोंगे सध्या बंद झाले. पण त्यातून शिवसेना आणि काँग्रेसची पोटदुखी सुरू झाली, असे दिसून येत आहे आणि या नव्या पोटदुखीतूनच काही वेगळे “खुसपटी मुद्दे” बाहेर काढले जात आहेत. After the anti-horn movement, he got unprecedented success. The horns on the mosques are currently closed

– ठाकरे – पवार सरकारचे मुसलमानांना झुकते माप

उदाहरणार्थ मनसेच्या भोंगे विरोधी आंदोलनांमुळे मुसलमानांपेक्षा हिंदूंचे जास्त नुकसान झाले. कारण मुंबईत 1140 मशिदी आहेत आणि 2400 प्रमुख मंदिरे आहेत. आता या सर्वांनाच भोंगे वापरता येणार नाहीत अथवा आवाजाची डेसिबल मर्यादा घरातल्या मिक्सर एवढी म्हणजे 55 अशीच ठेवावी लागेल. 20 मंदिरांकडे भोंगे लावण्याची परवानगी आहे, तर 922 मशिदींनी भोंगे लावण्याची परवानगी घेतली आहे. ही आकडेवारी सादर करून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हिंदूंचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. पण आकडेवारीतच “खरी मेख” आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने हिंदूंपेक्षा मुसलमानांनाच झुकते माप दिले आहे, हेच सावंत यांची आकडेवारी “बोलते” आहे.

– 2400 मंदिरे, 1140 मशिदी

सचिन सावंत यांनी हिंदूंचे नुकसान झाले हे सांगताना मुस्लिमांच्या मशिदींची संख्या आणि त्यांना भोंगे लावण्याची परवानगी या आकडेवारीतून वेगळे वास्तव पुढे आणले आहे. जर फक्त 20 मंदिरांना परवानगी असेल 922 मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी कशी दिली??, हा सवाल आपोआप तयार होतो आहे. त्याचबरोबर मुस्लिमांची मुंबईतील लोकसंख्या आणि मशिदींची संख्या याचे प्रपोर्शन आणि हिंदूंची लोकसंख्या आणि मंदिरांची संख्या त्याचे असलेले प्रपोर्शन याबाबतही बरेच “बोलके” संदर्भ या आकडेवारीत आहेत.

– मराठी माध्यमांचा “वेगळा पॅटर्न”!!

त्याचवेळी मराठी माध्यमांचा बातम्या देण्याचा एक वेगळा पॅटर्न समोर आला आहे. मनसेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे त्यांचे सर्व्हे सांगत आहेत. त्यामुळे आता पंढरपूरची काकड आरती बंद झाली. शिर्डी काकड आरती बंद झाली, अशा बातम्या मराठी माध्यम आवर्जून देत आहेत. शिर्डीतील भोंग्या वरली अजान बंद ठेवू. पण साईबाबांची काकड आरती सुरू ठेवा, अशी मागणी मुस्लिम समुदायाने केल्याच्या बातम्या देखील मराठी माध्यमांनी आवर्जून दिल्या आहेत. पण यातली एक मुख्य “मेख” मराठी माध्यमे मुद्दामून दडवून ठेवत आहेत. दिवसभरात मुस्लिम समाजाच्या अजान 5 वेळा भोग्यांवरून होत होत्या. डेसिबलच्या मर्यादा सगळीकडेच तुडवल्या जात होत्या. हिंदू मंदिरातल्या जास्तीत जास्त फक्त 2 वेळच्या आरत्या भोंग्यांवरून होत होत्या शिवाय कोणत्याही शहरातल्या सर्वात मोठ्या मंदिरांवरच भोंगे असतात. प्रत्येक छोट्या मंदिरांमध्ये भोंगे असतातच असे कुठलेही आढळत नाही. ही वस्तुस्थिती मराठी माध्यमांनी बातम्या देताना दडपली आहे.

– हिंदु सणांवर बंदीचा डाव

आता त्यापलिकडे जाऊन मग हिंदू सणांना हिंदू उत्सवांना बंदी सहन करावी लागेल, असाही अजब तर्कटही लढवण्यात येत आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि अन्य महापुरुषांच्या जयंत्या वगळतात हिंदू सणांच्या मध्ये कुठेच सार्वजनिक पातळीवर भोंग्यांचा वापर होत नाही. मशिदींमध्ये मात्र 365 दिवस रोज 5 वेळा भोंग्यांवरच अजान होत होत्या. मनसेच्या आंदोलनामुळे त्या बंद कराव्या लागल्या आहेत, हे सत्य मराठी माध्यमे दडपत आहेत. शिवसेना आणि काँग्रेस बरोबरच मराठी माध्यमांची देखील ही “चालूगिरी” आता उघडी पडली आहे…!!

After the anti-horn movement, he got unprecedented success. The horns on the mosques are currently closed