प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका हनुमान चालीसा लावण्याचा मुद्दा बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू असताना बॉलिवूडचे 3 खान मात्र अद्याप गप्प आहेत. Bollywood’s 3 Khans still silent on Bhonga controversy
देशात मोदी सरकार आल्यानंतर भारतात अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटते. अल्पसंख्यांकांचे जीवित आणि मालमत्ता धोक्यात आहेत, अशी मखलाशी करणारी 3 खान भोंगा वादावर मात्र बोलायला तयार नाहीत. तिन्ही खानांनी आपापल्या घरात काल आपल्या मित्रमंडळीं समवेत ईद साजरी केली. पण कोणीही भोंगा वादावर चकार शब्द काढला नाही.
शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी लाच दिल्याप्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या मर्सिडीजने डील केल्याचा आरोपाला पुष्टी?
आमिर खान आणि आमिर खानची भूतपूर्व बायको किरण राव यांना काही वर्षांपूर्वी भारतात असुरक्षित वाटत होते. सलमान खानने अशी कुठली टिपणी केली नव्हती पण त्याचे मौनही सूचक होते. शाहरुख खानला देखील भारतात असुरक्षित वाटत होते. परंतु, मध्यंतरी त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केसमध्ये सापडल्यानंतर शाहरुख खान एकदा दिल्लीवारी करून आला. त्यानंतर तो गप्प आहे. भोंगा वाद सुरू होऊन महाराष्ट्रात आणि देशात राजकीय गदारोळ सुरू झाल्यानंतर देखील हे तीनही खान सध्या गप्प आहेत.
सलमान खानने काल ईदची पार्टी आयोजित केली. तिला शिवसेनेशी थेट पंगा घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने हजेरी लावली. तीनही खानांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसताना लंडन मध्ये बसून कमाल आर. खान याने मात्र नेहमीप्रमाणे मुस्लिमांच्या अत्याचारांबद्दल ट्विट करून मुस्लिमांनी दंडावर काळे किती बांधून नमाज पठण करावे असे आव्हान केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App