कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून ५ ते ११ मे दरम्यान मुंबईत सुनावणी कार्यक्रम होणार आहे. यात शरद पवार, रवींद्र सेनगावकर, संदीप पखाले, सुवेज हक, हर्षाली पोतदार यांच्या साक्ष नोंदवल्या जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार तसेच तत्कालीन अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, आयपीएस अधिकारी संदीप पखाले, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक आणि हर्षाली पोतदार यांच्या महत्त्वपूर्ण साक्ष पुन्हा एकदा कोरेगाव भीमा चौकशी आयोग नाेंदवणार आहे, अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकर यांनी दिली.तसेच महत्त्वाचे कारण असल्याशिवाय कोणालाही गैरहजर राहता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.Koregav bhima enquiry commission next week statement persons shedule declare
मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे येत्या ५ ते ११ मे दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ यादरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत खासदार शरद पवार यांनी ही घटना पूर्वनियोजित होती. तसेच इतर काही वक्तव्ये केली होती. त्या अनुषंगाने पवार यांची सुनावणीत पुरावे तसेच साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या मुंबईत अशा होणार सुनावण्या…
* ५ आणि ६ मे :- शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार
* ५ आणि ६ मे :- संदीप पखाले, आयपीएस अधिकारी * ७ आणि ९ मे :- विश्वास नांगरे-पाटील, तत्कालिन काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक
* ७ आणि ९ मे :- रवींद्र सेनगावकर, तत्कालीन अपर पोलीस आयुक्त * १० आणि ११ मे :- हर्षाली पोतदार
* १० आणि ११ मे :- सुवेज हक, तत्कालिन पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App