Navneet Rana : राणा दांपत्याचा जामीन घेण्यास नकार, पण नारायण राणे – फडणवीसांना “साद”!!

प्रतिनिधी

मुंबई : हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेणाऱ्या राणा दांपत्याला खार पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले आहे. राणा दाम्पत्याने जामीन घ्यायला नकार दिला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध उलट तक्रार दाखल केली आहे. त्याच वेळी एक व्हिडिओ जारी करत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून काही सवाल केले आहेत. आपल्यासारखे एवढे कणखर नेते महाराष्ट्रात असताना लोकप्रतिनिधींना पोलीस कसे अडकवून ठेऊ शकतात?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर आरोप राणा दाम्पत्याने केले आहेत.Rana refuses to grant bail to couple

राणा दांपत्याच्या सुटकेसाठी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस देखील ऍक्टिव्ह झाल्याचे समजते.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आल्यानंतर राज्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील चार घटनांचा उल्लेख करत महाराष्ट्रातील या घटना व्यथित करणाऱ्या आहेत, अशी प्रतिक्रिया ट्विटरद्वारे दिली आहे.

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर अटक होते. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा होते, पण त्याची साधी दखलही घेतली जात नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला होतो, पण याचाही साधा गुन्हा दाखल होत नाही. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले होतात, पण आरोपी अटकेत नाही अशाप्रकारच्या चार घटनांचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.

राणांच्या व्हिडिओनंतर ट्वीट

नवनीत राणा यांनी घरातून एक व्हिडिओ व्हायरल करत देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या सारखे नेते महाराष्ट्रात असताना असे अन्याय कसे होतात असा सवाल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया देत चिंता व्यक्त केली.

फडणवीसांचे सवाल

त्याआधी त्यांनी ट्विटवर इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढी तुमची मर्दुमकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद असे म्हणत त्यांनी लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का, असाही सवाल फडणवीस यांनी ट्विटवर केला आहे.

Rana refuses to grant bail to couple

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात