प्रतिनिधी
नागपूर : अमरावतीमध्ये हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या शिवाय वसुली रॅकेटमुळेच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या 12 तासांच्या आत स्थिगिती दिली का??, असा सवालही त्यांनी ठाकरे – पवार सरकारला केला आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. Hindus are the only target in Amravati; Did the recovery racket delay police transfers
राज्य सरकारने कालच 14 पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदलीचे आदेश दिले होते. या निर्णयाला 12 तास उलटत नाही तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. अवघ्या 12 तासांत बदल्यांना स्थिगिती का दिली, असा सवाल त्यांनी आघाडी सरकारला केला. तसेच, बदल्यांना स्थगिती देण्यामागे वसुली रॅकेटचा हात आहे का, हेदेखील सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अमरावतीमध्ये इंग्रजांचे राज्य!
अमरावती दंगलप्रकरणी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावतीमध्ये इंग्रजांचे राज्य असल्यासारखी स्थिती आहे. अमरावती दंगलीनंतर करण्यात येत असलेल्या पोलिसांच्या कारवाईवरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दंगलीनंतर हिंदुंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सरकारकडून केले जात आहे. पोलिसांनी जात-धर्म न पाहता दोषींवर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Maharashtra | Cancellation of police reshuffle draws attention. What is the real reason behind it? The last time when the transfer of 10 DCP officers was cancelled it came to light as a transfer scam: BJP leader Devendra Fadnavis over IPS officers transferred pic.twitter.com/nfNuT6lZHE — ANI (@ANI) April 21, 2022
Maharashtra | Cancellation of police reshuffle draws attention. What is the real reason behind it? The last time when the transfer of 10 DCP officers was cancelled it came to light as a transfer scam: BJP leader Devendra Fadnavis over IPS officers transferred pic.twitter.com/nfNuT6lZHE
— ANI (@ANI) April 21, 2022
…तर पोलिसांचीही पोलखोल करू!
मुंबई महापालिकेत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यासाठी भाजपने पोलखोल अभियान सुरू केले आहे. या पोलखोल अभियानामुळे सत्ताधाऱ्यांना धास्ती भरली आहे. त्यामुळे भाजपच्या रथावर व स्टेजवर हल्ला करण्यात आला, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच, पोलिसांनी याप्रकरणी निष्पक्ष कारवाई करावी. पोलिसांनी दोषींना संरक्षण देण्याचे काम केल्यास त्यांचीही पोलखोल करू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राऊतांच्या नागपूर दौऱ्यांनी फरक पडणार नाही!
शिवसेना नेते संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूर हा हिंदुत्वाचा गड असल्याने शिवसेनेचा झेंडा येथे घट्ट रोवायचा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या नेत्यांनी कितीही नागपूर दौरे केले तरी काहीही फरक पडणार नाही. नागपूरमध्ये भाजप भक्कम स्थितीत असल्याचे फडणवीस म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App