रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील प्रमुख स्टील कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहे. भारतीय स्टील कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली.Tata Steel takes big decision, Europe branch closes business with Russia
वृत्तसंस्था
मुंबई : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील प्रमुख स्टील कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहे. भारतीय स्टील कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली.
युद्धामुळे घेतला निर्णय
भारतीय पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलची युरोपीय शाखेने बुधवारी म्हटले की, ते रशियासोबत व्यवसाय करणे थांबवत आहेत. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या देशाशी संबंध तोडणाऱ्या जागतिक कंपन्यांत आता टाटा स्टीलचे नाव आहे.
व्यवसाय बंद करण्याचा निर्णय
टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, “रशियामध्ये टाटा स्टीलचे कोणतेही काम किंवा कर्मचारी नाहीत. आम्ही रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.”
कच्च्या मालाचा पुरवठा
टाटा स्टीलने सांगितले की भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व दूर करण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केला आहे.
कंपनी शेअर्सचे वितरण करण्याच्या विचारात
टाटा स्टीलचे संचालक मंडळ 3 मे रोजी कंपनीच्या शेअर्सचे वितरण करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल. याबाबत कंपनीने नुकतीच माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी त्यांचे संचालक मंडळ 3 मे रोजी भेटेल. कंपनीने सांगितले की,
बैठकीत संचालक मंडळाने ठरवलेल्या पद्धतीने 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स विभाजित करण्याचा विचार केला जाईल. यासाठी नियामक मंजुरींशिवाय भागधारकांचीही मान्यता घेतली जाणार आहे. बैठकीत संचालक मंडळ 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लाभांशाची शिफारसदेखील करू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App