तेलंगणामध्ये टीआरएसचे गुंडाराज, माय-लेकाने पेटवून घेतानो व्हिडीओ पोस्ट करत सांगितली नेत्यांकडून झालेली छळवणूक


विशेष प्रतिनिधी

कामारेड्डी : तेलंगणामध्ये तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यांच्या गुंडाराजने मायलेकाचा बळी घेतला. एका व्यावसायिकाने पेटवून घेण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करीत आपल्याला नेत्यांनी कसे छळले याची आपबिती मांडली. त्यानंतर पोलीसांनी ६ नेत्यांना अटक केली आहे.In Telangana, a businessman was burnt to death along with his mother due to persecution by the TRS leaders

गंगम संतोष आणि त्यांची आई गंगम पद्मा यांनी कामारेड्डीतील लॉजमध्ये १६ एप्रिल रोजी पेटवून घेतले होते. मंडळ निरीक्षक आणि टीआरएसचे नेते छळत असल्याचा या दोघांनी आरोप केला होता. पेटवून घ्यायच्या आधी संतोष गंगम यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी ७ जणांची छायाचित्रे आणि नावे सांगितली होती.



या सात जणांमध्ये रामायापेट नगरपालिकेचे अध्यक्ष पी. जितेंद्र गौड, टीआरएसचे पाच नेते आणि मंडळ निरीक्षक नागार्जुन रेड्डी यांचा समावेश आहे. संतोष यांच्या सुसाईड नोटमध्ये या ७ जणांनी माझ्या व्यवसायाचेही नुकसान करून जगणे अवघड केल्याचा आरोप केला आहे, असे पोलीस म्हणाले. मला आर्थिकदृष्ट्या त्यांनी उद्ध्वस्त केले.

आम्ही मरण पावल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, असेही चिठ्ठीत म्हटले आहे. एका प्रकरणात मंडळ निरीक्षकाने माझा फोन तपासासाठी घेतला. निरीक्षकाने फोनमधील गोपनीय माहिती काढून घेऊन तो मला परत केला, असा आरोप संतोष गंगमने केला आहे. ती गोपनीय माहिती निरीक्षकाने टीआरएस नेत्यांना दिली व त्यांनी तिचा गैरवापर केला, असेही संतोष गंगमचे आरोप आहेत.

In Telangana, a businessman was burnt to death along with his mother due to persecution by the TRS leaders

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात