विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-२ ए) या ५.४६४ कि.मी. लांबी, ३ स्थानके असलेल्या ३६६८ कोटी खर्चाच्या पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.Completely underground metro rail project from Swargate to Katraj assumption
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात ४५०.९५ कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर/शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात ४४..३२ कोटी असा एकूण ८९१.२७ कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. एप्रिल, २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून ४५०.९५ कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज यासाठी २०४.१४ कोटी असे एकूण ६५५.९ कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून ३००.६३ कोटी अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.
स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App