वृत्तसंस्था
चेन्नई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आत्तापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत एमवे इंडिया कंपनीची तब्बल 757.77 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मल्टी लेवल मार्केटिंग करणाऱ्या या कंपनीतून प्रचंड मोठा घोटाळा बाहेर आला आहे. त्यातूनच चौकशी आणि तपासानंतर ईडीने 757.77 कोटी रुपयांची प्रचंड मालमत्ता जप्त केली आहे. ED’s massive action; Amway’s assets worth Rs 757.77 crore seized
एमवे इंडिया कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेत 41.83 कोटींची स्थावर मालमत्ता, तर 345.94 कोटींच्या रोख रकमा विविध 36 अकाउंट मधून ईडीने जप्त केल्या आहेत.
एमवे इंडिया कंपनीने मल्टी लेवल मार्केटिंग करताना आपल्या विशिष्ट सभासदांनाच श्रीमंत करण्याचे धोरण आखले होते आणि त्याच नादात गुंतवणूकदारांचे पैसे विशिष्ट व्यक्तींच्या नावाने वळवत मोठा फ्रॉड उभा केला. यातून कोट्यावधींचे मनी लॉन्ड्रिंग केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एमवे ही मुळातली अमेरिकन कंपनी. 1996 – 97 मध्ये 21.39 कोटी रुपयांचे भाग भांडवल घेऊन भारतात आली होती. परंतु थोड्याच दिवसात डिव्हिडंडच्या रूपात तब्बल 2859.19 कोटी रुपये तिने आपल्या विशिष्ट सभासदांना वाटले. सभासदांची मोठी चेन तयार करणे यातून त्यानंतर हे प्रमाण वाढतच गेले. नुसत्या कमिशनपोटी कंपनीने 7588 कोटी रुपये आत्तापर्यंत वाटले आहेत.
2002 – 03 पासून 2020 – 21 पर्यंत कंपनीने भारतातून तब्बल 27562 कोटी रुपये कमावले असून त्याचाही विनियोग एमवेची प्रॉडक्ट सुधारण्याकडे न करता फक्त मल्टिलेव्हल मार्केटिंग करून सभासदांना प्रचंड लाभ मिळवून देणे आणि मनी लॉन्ड्रिंग करणे यावरच खर्च करण्यात आले आहेत.
त्यामुळेच सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धडक कारवाई करून तामिळनाडूतील दिंडीगल येथील एमवे इंडिया कंपनीचे अलिशान कार्यालय, उत्पादन केंद्र अशी स्थावर मालमत्ता मिळून 411.83 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच वेगवेगळ्या 36 अकाउंट मधून 345.94 कोटी रुपयांची रक्कमही जप्त केली आहे. सक्तवसुली संचालनालय केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App