राज ठाकरे यांच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग “आज”पासून “उद्या”कडे जाण्याऐवजी “आज” पासून “काल”कडे गेलेले दिसत आहे. राजकीय कालचक्र उलटे फिरवण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न दिसतो आहे. कारण सर्वच पक्षांनी जुन्या मुद्द्यांवर आपले राजकारण पण खेळायचे ठरवले दिसत आहे. मशिदींवरचे भोंगे हा काही नवा विषय नाही. पण राज ठाकरे यांनी तो “राजकीय टायमिंग” साधून काढला आणि ते “अदखलपात्र” आहेत असे म्हणत शरद पवारांपासून सगळ्याच नेत्यांनी राज यांना धारेवर धरले…!! James Laine: The “political appeal” of James Laine remains … ??
मशिदींवरचे भोंगे हा “काल”चा विषय “आज” काढून तो “उद्या” पेटत राहील, अशी व्यवस्था सर्व नेत्यांनी केली आहे. राज ठाकरे यांचे लोकप्रतिनिधी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही निवडून येत नाही, असे शरद पवारांनी त्यांना हिणवले. पण ज्यांचे खासदार कायमच हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच निवडून येत राहिले, त्यांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा “काल” फळाला आली नाही. “आज” फळाला येत नाही आणि “उद्या”ही फळाला येण्याची शक्यता नाही…!!
पण राजकारणाचे जुनेच गिरमिट कोणाला चालवत राहायाचे असेल, तर त्याला दुसरे कोण काय करणार…?? म्हणून पुन्हा एकदा जेम्स लेनचा घिसापिटा झालेला विषय पुन्हा उकरून काढला. त्यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा केली. बाबासाहेब पुरंदरेंवर, ते गेल्यानंतरही सोशल मीडिया फौजा तुटून पडल्या.
वास्तविक 2004 च्या निवडणुकीत मराठा आणि मराठेतर ध्रुवीकरण करण्यासाठी जेम्स लेनच्या विषयाचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच करून घेतला आहे. जेम्स लेन याने त्याच्या पुस्तकात जे लिहिले त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण वारंवार जुन्या चहाला उकळी आणायची आणि तोच चहा समोरच्या ग्लासात भरून द्यायचा असेच राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले असेल तर त्याला कोण काय करणार…??
1990 च्या निवडणुकीत जोशी – महाजनांच्या हातात सत्ता देणार का?? इथपासून सुरू झालेला विषय 2004 मध्ये जेम्स लेन पर्यंत पोहोचवला. शरद पवारांनी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे विषय काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे यश मिळाले ते मर्यादितच होते. पण आता 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यानंतरही 2022 मध्ये नव्या विषयांची उणीव भासत असेल म्हणून जेम्स लेनचा घिसापिटा विषय पुन्हा काढला का…?? आणि जर तो तसा काढला असेल तर त्याचा राजकीय लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला किती होईल…?? पुन्हा – पुन्हा तेच विषय उकरून काढल्याने आपल्या यशाची मर्यादा राष्ट्रवादी कॉंग्रेस कशी काय ओलांडू शकेल…?? हा खरा प्रश्न आहे.
पण जेम्स लेनच्या विषयाचे तसे नाही. जेम्स लेनचा विषय राष्ट्रवादीने वापरून – वापरून गुळगुळीत केला आहे. त्या विषयातले “पॉलिटिकल अपील” संपले आहे…!! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कितीही अमान्य करत असतील तरी त्यातून मिळणारे राजकीय यश तेव्हाही मर्यादित होते. आजही मर्यादित राहिले आहे आणि उद्याही मर्यादित राहणार आहे. त्यामुळे फार तर आपले राजकीय अस्तित्व नव्याने टिकवण्यासाठी उपयोगी ठरेल म्हणून जेम्स लेनचा विषय पुन्हा उकरून काढला जातोय का…?? हाच खरा प्रश्न आहे… आणि तसे असेल… मतदार ध्रुवीकरणाचे नवे विषय सापडत नसतील तर मराठी माध्यमांनी गौरवलेले “जाणते राजे” आणि “चाणक्य” हे खरेच “जाणते” आणि “चाणाक्ष” आहेत का…??
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App