विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशातील सीतापुरमध्ये महंत बजरंग मुनी दास यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. यात महंत गर्दीसमोर एका समुदायाच्या महिला आणि मुलींना घरातून पळवून सार्वजनिक ठिकाणी बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.Rape women and girls from certain communities and rape them in public places, controversial appeal of mahant in Sitapur
शुक्रवारी महंत बजरंग मुनींचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. गेल्या 2 एप्रिल रोजी महंत बजरंग मुनी दास खैराबाद भागातील शीशे मशिदीसमोर आले होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महंत म्हणतात की…जर कोणती हिंदू मुलीची छेड काढली तर…तुमची सून, मुलीला सर्वांसमोर उचलून आणेल.
महंत म्हणाले, माझ्या हत्येसाठी 28 लाख रुपये जमवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आल्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणात दखल घेत डीजीपींना पुढील सात दिवसात कारवाई करून रिपोर्ट देण्याची मागणी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App