ईडीला घाबरलेल्या हर्षवर्धन पाटलांना आता शांत झोप लागेल, छगन भुजबळ यांचा टोमणा

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : पूर्वी ईडी कोणाला माहीत होता. कोणालाच नाही. भाजपने ईडीचा राक्षस बाहेर आणून दहशत निर्माण केली आहे. ईडीमुळे हर्षवर्धन पाटलांना आता सकाळी अकरापर्यंत शांत झोप लागते. तर भाजप विरोधात कडाडून टीका करणारे राज ठाकरे आता भोंग्यावर बोलू लागले आहेत, असा टोमणा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.Harshvardhan Patil, who was scared of ED, will now have a good night’s sleep, Chhagan Bhujbal scoffed

सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, ते म्हणाले की, शिवसेना हा भाजपचा दोस्त होता. दोस्ती तोडून शिवसेनेने सरकार स्थापन केल्याने भाजप त्यांच्यावर नाराज आहे. याच नाराजीतून शिवसेना आणि शिवसेनेच्या मित्रपक्षांना भाजपकडून त्रास दिला जातोय. ईडीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून, ते चुकीचे आहे. हे लोकशाहीला हानीकारक आहे.



ईडी हा जुनाच आहे. आजपर्यंत ईडी कोणाला माहीतच नव्हता. विरोधी राजकारण्यांना तुरुंगात टाकून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत.ईडीचा कायदा जुनाच आहे. या कायद्याचा दुरुपयोग होत आहे, असा आरोप करून भुजबळ म्हणाले, इतर कायद्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळतो. ईडी कायद्यात जामीन लवकर मिळत नाही.

गैरव्यवहाराची रक्कम अव्वा च्या सव्वा दाखवून विरोधी नेत्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या संपत्तीवर टाच आणून मानसिक त्रासदेखील दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून हरतहेर्चे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या समन्वयातून महाविकास आघाडी सरकार पडणार नाही.

Harshvardhan Patil, who was scared of ED, will now have a good night’s sleep, Chhagan Bhujbal scoffed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात