वृत्तसंस्था
कानपूर : संपूर्ण देशभरात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकीय घमासान सुरू असताना त्यामध्ये सुन्नी उलेमा कौन्सिलने देखील उडी घेतली आहे. 24 तासांच्या अखंड पाठाने ध्वनिप्रदूषण होते. 2.5 मिनिटांच्या अजानने नव्हे, अशी आगपाखड सुन्नी उलेमा कौन्सिलचे सरचिटणीस हाजी मोहम्मद सालीस यांनी केली आहे.Buzzers on the mosque: Noise pollution after 24 hours of continuous reading; Not without the 2.5 minute ignorance; Sunni Ulema Council fire
कर्नाटकातल्या 125 हून अधिक मशिदींना भोंग्यांच्या आवाजासंदर्भात पोलिसांनी नोटीसा पाठवल्यावर हाजी मोहम्मद सालीस यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतातल्या हिंदुत्ववादी शक्ती देशाला जातीय द्वेषाच्या आगीत लोटत आहेत. हिंदुत्ववादी शक्तींना टोप्या, हिजाब घालणाऱ्यांबद्दल द्वेष आहे. त्यामुळेच मॉब लिंचींग होते आहे, असा आरोप हाजी मोहम्मद सालीस यांनी केला आहे.
त्याच वेळी त्यांनी ध्वनिप्रदूषणावरून हिंदू समाजाच्या अखंड पाठ धार्मिक विधीला आक्षेप घेतला आहे. 24 तासांच्या अखंड पाठामुळे ध्वनी प्रदूषण होते. ते हिंदुत्ववादी शक्तींना दिसत नाही, पण 2 – 2.5 मिनिटांच्या अजानमुळे ध्वनि प्रदूषण झाल्याचे त्यांना दिसते, अशा शब्दात हाजी मोहम्मद सालीस यांनी आगपाखड केली आहे.
काँग्रेसचीही आगपाखड
कर्नाटकात 125 हून अधिक मशिदींना पोलिसांनी नोटीस पाठवल्याबद्दल काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी देखील भाजप सरकारवर शरसंधान साधले आहे. भाजपला समाजात हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकायची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रत्यक्षात बंगळुरू पोलिसांनी मशिदींबरोबरच मंदिरे आणि चर्चेसना देखील आवाज मर्यादित ठेवण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. परंतु सुन्नी उलेमा कौन्सिल आणि काँग्रेसने एकाच आवाजात हिंदुत्ववादी शक्तींवर शरसंधान साधले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App