1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांची 11.15 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर संजय राऊत नवी दिल्लीहून मुंबईला परतले. तेव्हा त्याच्या त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक जमले होते. मात्र विमानतळावर उतरताच आपण पवारांचा माणूस आहोत हे लपून राहिलेले नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.Sanjay Raut: Only Shiv Sainiks welcome “Pawar’s man”; No NCP leader or activist
मात्र आज अशा या “पवारांच्या माणसाच्या” स्वागतासाठी फक्त शिवसैनिक आणि शिवसेना खासदार जमल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या… कारण “पवारांचा माणूस” मुंबईला येऊनही राष्ट्रवादीचा एकही नेता अथवा कार्यकर्ता त्यांच्या स्वागताला मुंबई विमानतळावर उपस्थित राहिलेला दिसला नाही…!!
संजय राऊत यांच्या स्वागतासाठी खासदार विनायक राऊत, संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत आणि आमदार सुनील प्रभू हे तीनच नेते उपस्थित होते आणि त्यांच्या बरोबर बाकीचे शिवसैनिक ढोल-ताशांसह हजर होते. “योद्धा संजय राऊत”, असे फलक शिवसैनिकांनी विमानतळावर लावले होते.
“पवारांच्या माणसाने” शिवसेना सोडली??
मात्र या सगळ्या गर्दीत “पवारांचा माणूस” असलेल्या संजय राऊत यांचे स्वागत करायला मुंबईला आणि महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा एकही नेता अथवा कार्यकर्ता हजर नव्हता. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. इतकेच नाही तर “पवारांचा माणूस” आहोत असे सांगून संजय राऊत यांनी शिवसेना सोडली का?? आणि शिवसेना सोडली असेल तर त्यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हवे असताना फक्त शिवसैनिकच का हजर राहिले??, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गजा मारणेच्या स्वागताची तुलना
संजय राऊत यांचा डोळा पक्षप्रमुख पदावर असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे, तर संजय राऊत यांच्या स्वागताची तुलना सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्याचा गुंड गजा मारणेच्या स्वागताशी केली आहे. गुंड गजा मारणे हा तळोजा कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर त्याच्या मिरवणुकीमध्ये 300 गाड्या सामील झाल्या होत्या. त्यावरून मुंबई हायकोर्टाने ठाकरे – पवार सरकारला धारेवर धरून पोलिसांना जबरदस्त छापले होते शेवटी गजा मारणेची रवानगी पुन्हा एकदा तुरुंगात करण्यात आली होती, याची आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी करून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App