प्रतिनिधी
औरंगाबाद : नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सकाळच्या नगर आवृत्तीचा माजी कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे पाटील याचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज फेटाळून लावला. न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांनी हा निर्णय दिला. बाळ बोठे पाटलाविरुद्ध अनेक सबळ पुरावे दिसून येतात, त्यामुळे जामीन फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.Rekha Jare murder case: Strong evidence against Bal Bothe Patil; High court rejects bail
३० नोव्हेंबर २०२० रोजी रेखा जरी यांचा खून झाला होता. त्यांच्यावर बाळ बोटे पाटील याने पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले होते. मात्र पोलीस तपासात त्याच्याच विरुद्ध संशयाची सुई बळावल्यानंतर बाळ बोठे पाटील हा लगेच फरार झाला होता. त्याला १३ मार्च २०२१ रोजी हैदराबाद मधून पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो तुरूंगात आहे.
बोठे पाटील याने १४ जुलै रोजी नगरच्या सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र २३ सप्टेंबर 2021 ला जिल्हा – सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. समोर आलेल्या पुराव्यांवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याचा गुन्ह्यातील सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
या निर्णयाविरोधात बोठे पाटीलने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. तेथे अनेकदा विविध कारणांमुळे सुनावणी लांबणीवर पडली. २८ फेब्रुवारीला त्यावर न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तिवाद सुरू झाला. आज या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने आपला निर्णय देत जामीन अर्ज फेटाळून लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या जरे यांचा ३० नोव्हेंबरला सायंकाळी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात गळा चिरून खून झाला होता. सुरवातीला हे प्रकरण गाडीला कट मारल्याच्या कारणातून झाल्याचे पुढे आले होते. मात्र, त्यानंतर हा कट रचून, सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले. सकाळच्या नगर आवृत्तीचा त्यावेळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे पाटील याचे मुख्य आरोपी म्हणून नाव पुढे आले. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न आणि बराच काळ फरारी राहिल्यानंतर अखेर बोठे पाटलाला अटक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App