प्रतिनिधी
मुंबई : एखादी गोष्ट सांगताना आपल्याला कोणी इत्यंभूत देत नाही… पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भेट घेतल्याची बातमी ऐकल्यावर आम्ही पवार साहेबांना फोन केला. तेव्हा त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर मोदींशी चर्चा केल्याचे आम्हाला सांगितले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.Who doesn’t tell you the truth when telling a story, but …; Ajit Pawar’s statement !!
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबते झाली, याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणंमे बदलण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. स्वतः शरद पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर सुद्धा या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. त्यावर अजित पवार यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
मोदी आणि पवार यांच्या भेटीबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून त्याला राजकीय वळण देण्यात येत आहे. या भेटीत देश आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी मला सांगितले, असे अजित पवार म्हणाले.
आम्ही पवारांना फोन केला तेव्हा…
एखादी गोष्ट सांगताना आपल्याला कोणीही इत्थंभूत माहिती देत नाही. या भेटीची बातमी कळली तेव्हा मी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कोपरगांव येथे होतो. त्यानंतर आम्ही शरद पवारांना फोन केला. जे महत्त्वाचे विषय होते त्याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्याचे पवारांनी आम्हाला त्यावेळी सांगितले.
पवार साहेब बोलल्यानंतर…
काही जण जाणीवपूर्वक अशाप्रकारच्या बातम्यांचा विपर्यास करुन समाजात गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे या सगळ्याला काही अर्थ नसल्याचे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. एकदा पवार साहेब बोलल्यानंतर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत पुन्हा काही म्हणणे योग्य नसल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App