वृत्तसंस्था
मुंबई: तेरा वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आपल्या मुलाच्या विरोधात उभे राहिल्याबद्दल एका६० वर्षीय आजीचे कौतुक करत, विशेष पॉक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवून २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. Woman deposes against son who raped daughter
विशेष न्यायाधीश भारती काळे यांनी सोमवारी यांनी याबाबतचा निकाल दिला. तेव्हा पीडितेच्या आजीचे कौतुक केले आहे. घटनेच्या सात वर्षांपूर्वी मुलीची आई कुटुंब सोडून गेली होती. १० x१० खोलीच्या सदनिकेत मुलगी, वडील, आजी-आजोबा, काका आणि दोन भावंडांसोबत राहत होती. आरोपीने तिच्यावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केल्यानंतर एका वर्षानंतरच मे २०२१ मध्ये तिने तिच्या आजीला ही बाब सांगितली. तिने याविरोधात पोलिसात तक्रार केली होती.
सध्या निवारागृहात असलेल्या मुलीने सांगितले की, तिचे वडील सर्वजण झोपलेले असताना खोलीच्या एका कोपऱ्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आता आणि वाच्यता करू नको, असे धमकावत असे.
खोली लहान असल्याने तसे कृत्य कसे करेन या आरोपीच्या बचावाचे खंडन करताना, न्यायाधीश म्हणाले की मुलगी अन्यायाला वाचा फोडण्यात. अपयशी ठरली. मात्र आजीने मुलाविरोधात तक्रार दिली आणि आवाज उठविला. ही बाब कौतुकास्पद आहे.
पीडितेला ओरडण्यात अपयश येण्याचे मुख्य कारण म्हणजे मनात ही भीती असते की जर एखाद्या जवळच्या नातेवाईकाने असे कृत्य केले तर त्यांच्या आयुष्याचे काय होईल ? कारण भविष्याची अनिश्चितता आहे. स्वतःच्या घरात संरक्षण नसते आणि त्यांना बाहेरच्या जगाची भीती असते, ” असे न्यायालयाने मत व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App