मम्मीच्या घरापासून मनमोहनजींच्या घरापर्यंत पदयात्रा काढली तर महागाई का वाढली हे समजेल. आज पुरवठा साखळी आणि युद्धामुळे महागाई वाढली आहे. इंग्लंडमध्ये महागाई 20% पेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे, असा टोला दुसरीकडे, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना लगावला आहे.take a walk from mummy’s house to Manmohan’s house
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मम्मीच्या घरापासून मनमोहनजींच्या घरापर्यंत पदयात्रा काढली तर महागाई का वाढली हे समजेल. आज पुरवठा साखळी आणि युद्धामुळे महागाई वाढली आहे. इंग्लंडमध्ये महागाई 20% पेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे, असा टोला दुसरीकडे, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांना लगावला आहे.
देशातील सतत वाढत चाललेल्या कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाईबाबत काँग्रेसने केंद्र सरकारचा घेराव सुरू केला आहे. गुरुवारी राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी विजय चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी नेत्यांनी गॅस सिलिंडर व दुचाकी समोर ठेवून त्यांना पुष्पहार घालून पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराचा निषेध केला. राहुल यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक सिंघवी हे ही उपस्थित होते. ‘
इंधन दरवाढ मागे घ्या’ अशा पोस्टरचे देखील त्यांना प्रदर्शन केले. यावर नक्वी म्हणाले, काँग्रेसच्या या प्रचारावर लोकांना एवढी मेहनत करण्याची गरज नाही, असा टोला दिला आहे.
आंदोलना दरम्यान राहुल गांधी म्हणाले की, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 9 वेळा वाढल्या असून त्याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर होत आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवणे थांबवावे, आंदोलना दरम्यान राहुल गांधी बोलतांना म्हणाले.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या खिशाला झगा घालणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करत आहोत. मोदीजींनी 10 दिवसात 9 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून इतिहास घडवला. 137 दिवसांनंतरही भाव अनाठायी वाढत आहेत. सरकारने ही किंमत परत घ्यावी, अशी आमची मागणी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App