विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून आपल्याला हटवावे यासाठी अमेरिकेने धमकी दिली होती. इम्रान खान पंतप्रधानपदी राहिले तर तुमच्यासाठी पुढील काळ कठीण असेल असा इशारा दिला होता असा आरोप त्यांनी केला आहे. हे षडयंत्र कोणाचे आहे हे देखील आपणास माहित आहे, असे ते म्हणाले आहेत. अमेरिकेने मात्र हा आरोप फेटाळला आहे.Imran Khan’s direct accusation against US, message of removal from the post of Prime Minister
टीव्हीवरील एका भाषणात बोलताना इम्रान खान म्हणाले, परकीय सत्तेला अगोदरच माहित होते की अविश्वास प्रस्ताव सादर केला जाईल. याचा अर्थ विरोधी पक्ष विदेशातील लोकांच्या ओंजळीने पाणी पित आहे. ते म्हणतात की ते (अमेरिका) पाकिस्तानवर नाराज आहेत.जर इम्रान खान अविश्वासाच्या निर्णयात हरले तर ते पाकिस्तानला माफ करतील, पण जर हे पाऊल अयशस्वी झाले तर पाकिस्तानला कठीण काळातून जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘धमकीच्या पत्रा’बद्दल बोलताना खान म्हणाले की त्यांच्या सरकारला उलथून टाकण्यासाठी परकीय षड्यंत्राचे पुरावे आहेत.आम्हाला एक संदेश मिळाला. एका स्वतंत्र देशासाठी असा संदेश येणे म्हणजे केवळ त्याच्या पंतप्रधानांच्या विरोधात नाही तर देशाविरुद्ध आहे. पाकिस्तानची सत्ता हाती घेतल्यापासूनच मी निर्णय घेतला होता की देशाचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण असेल.
ते पाकिस्तानींसाठी असेल. याचा अर्थ आम्हाला शत्रुत्व हवे होते असे नाही. आमचे धोरण अमेरिका, युरोप किंवा भारतविरोधी नव्हते. ते नंतर भारतविरोधी झाले. याचे कारण म्हणजे नंतर भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि आंतरराष्ट्रीय कायदा मोडला.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी मी राजीनामा देणार नाही, असे सांगताना इम्रान खान म्हणाले, मी आयुष्यात कधीही पराभव स्वीकारला नाही. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत खेळण्यासाठी ओळखला जातो. पाकिस्तान आपल्या इतिहासातील निर्णायक क्षणेवर पोहोचला आहे. खान यांना काढून टाकणे आवश्यक आहे असे संदेश पाठवण्यात एक परदेशी राष्ट्र सामील होता. असे झाले नाही तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशाराही दिला होता.
इम्रान खान म्हणाले, मी 20 वर्षे क्रिकेट खेळलो आहे. जगाने आणि माझ्यासोबत क्रिकेट खेळणाºयांनी पाहिले आहे की मी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलो. मी आयुष्यात कधीही पराभव स्वीकारला नाही. मी घरी बसेन असा विचार कोणी करू नये. परिणाम काहीही असो, मी मजबूतपणे परत येईन.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App