प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास संस्था सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाया सुरू असताना शिवसेना आक्रमक भूमिका घेते पण राष्ट्रवादी काँग्रेस सौम्य भूमिका घेते, असा ठपका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवल्यानंतर त्याची पुष्टी करणारे वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले आहे.ED Raids: Nana Patole’s anger against Modi against ED action
आज नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी वादग्रस्त वकील सतीश सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्या घरावर छापे घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घरातून काही कागदपत्रे लॅपटॉप आणि अन्य पुरावे जप्त केले. सतिष उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच फोन टॅपिंग प्रकरणातले ही ते फडणवीसांच्या सरकार विरोधातील वकील आहेत.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधातला आवाज बंद करण्याचे काम सरकार करत आहे. परंतु आम्ही मागे हटणार नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवतच राहू, असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मात्र आता ईडी, सीबीआय यांच्या कारवाया स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालून थांबवाव्यात, असे साकडे घातले आहे. ईडीच्या कारवायांचा महाराष्ट्रात अतिरेक होतो आहे, अशी तक्रार छगन भुजबळ यांनी केली आहे.
नाना – भुजबळ यांच्या भूमिकेतील फरक
म्हणजे एकीकडे नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संताप व्यक्त केला असताना दुसरीकडे छगन भुजबळ हे मात्र पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना साकडे घालत आहेत. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या भूमिके मधला फरक दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुद्दामून भाजप विरोधात मवाळ भूमिका घेत असल्याचा ठपका उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवार यांच्यापुढे ठेवला असताना छगन भुजबळ यांच्या मोदी – शहांना साकडे घालण्याचा कृतीतून राष्ट्रवादीची भाजपा विरोधातली सौम्य भूमिकाच दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App