विशेष प्रतिनिधी
मुंबई / सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाई करण्याबाबत ठाकरे – पवार सरकारने मुंबई हायकोर्टात माघार घेतली आहे, मात्र त्याच वेळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर तोंडी तोफा डागल्या आहेत. Thackeray – Pawar government’s withdrawal in Mumbai High Court
नारायण राणे यांच्या जूहू येथील अधीष बंगल्यातील बेकायदा बांधकामावर हातोडा चालविण्याचा निर्धार मुंबई महापालिकेने केला होता. परंतु, आज मुंबई हायकोर्टात मात्र ठाकरे सरकारने माघार घेत कारवाईचे आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले. ठाकरे – पवार सरकारचे वकील कुंभकोणी यांनी राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई मागे घेत असल्याचे हायकोर्टात स्पष्ट केले. राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्याला नोटीस न देता कारवाई कशी करता येऊ शकेल?, असा सवाल केला होता. त्यावर ठाकरे – पवार सरकारने माघार घेत सध्या कारवाई करणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.
आदित्य ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा सध्या सुरू आहे शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबियांचे नाव न घेता जोरदार तोफा डागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी आपण सिंधुदुर्गातली घाण काढून टाकली. 2014 मध्ये त्यांना पराभूत करून घेऊन आपण विकासाचा नारळ फोडला. आता सिंधुदुर्गला सुंदर पर्यटन जिल्हा बनवू, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प तसेच सिंधुदुर्ग पर्यटन केंद्र याविषयी देखील भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार कोकणाचा विकास करायला कटिबद्ध आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात आणले जातील. नाणार रिफायनरी प्रकल्प प्रदूषण होणार नसेल तर त्याला मान्यता देण्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मात्र सिंधुदुर्गातील घाण आपण काही वर्षांपूर्वी काढली, असे वक्तव्य करून आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांना टार्गेट केले आहे. आता त्यावर आणि कुटुंबीयांपैकी कोण आणि कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App