विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरात लव्ह जिहाद ही प्रकरणे समोर आल्यानंतर तसेच लव्ह जिहाद मधून झालेल्या अनेक हत्यांचे सत्य बाहेर आल्यानंतर मुस्लिम उच्चपदस्थांनी याबाबत उफराटे बोल बोलायला सुरुवात केली आहे…!! Love Jihad: Muslim elites talk about love jihad; S. Y. Qureshi Gayasuddin Sheikh’s “New Rationalist Pattern” !!
लव्ह जिहादला हा मर्यादा नाहीच. आम्ही घरात लव्ह जिहाद करतो. कारण प्रेम अमर्यादित असते. खरे म्हणजे सुशिक्षित मुस्लिम मुलांना हिंदू मुलीच आपल्याकडे आकर्षित करतात, असे अजब वक्तव्य माझी मुख्य निवडणूक आयुक्त शहाबुद्दिन याकुब कुरेशी यांनी केले आहे.
त्यातच आता गुजरातचे काँग्रेसचे आमदार गयासुद्दीन हाबीबुद्दिन शेख यांनी भर घातली आहे. लव्ह जिहाद नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही, असा दावा त्यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. लव्ह जिहाद बाबत तसेच मुस्लीम तुष्टीकरण याबाबत एस. वाय. कुरेशी यांनी दैनिक भास्करच्या मुलाखतीत काही मते व्यक्त केली आहेत. लव्ह जिहादच्या मुद्द्यावर मुस्लीम महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. हिंदू मुलीच सुशिक्षित मुस्लिम तरुणांना आकर्षित करतात. त्यांच्याशी लग्न करतात. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिम मुलींना उच्चशिक्षित मुस्लीम मुलगे लग्नासाठी मिळत नाही, असा अजब दावा कुरेशी यांनी केला आहे.
तर लव्ह जिहाद प्रकरणात मुस्लिमांपेक्षा हिंदूंचा सहभाग जास्त आहे. मुस्लिम मुलीच हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करून जात आहेत. हिंदू मुली मुस्लिम धर्मात येण्याचे प्रमाण त्यापेक्षा कमी आहे, असा दावा गयासुद्दीन शेख यांनी गुजरात विधानसभेत बोलताना केला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात मी लव्ह जिहादची 100 प्रकरणे सांगितली होती. त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम मुलींनीच धर्मांतर करून हिंदू धर्मात प्रवेश केल्याची उदाहरणे होती, असा दावाही शेख यांनी केला आहे. तर मुस्लीम तुष्टीकरण हे जाणून-बुजून पसरवलेले नेटिव आहे ती वस्तुस्थिती नाही. मुस्लिमांची लोकसंख्या येत्या 50 वर्षात भारतात बहुसंख्य होईल, असे खोटे बोलले जात आहे. मी दिल्लीचे प्राध्यापक दिनेश सिंग यांच्याकडून एक गणितीय मॉडेल बनवून घेतले होते. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्येच्या गणितीय मॉडेल नुसार पुढच्या 1000 वर्षात भारतात मुस्लिम बहुसंख्यांक होत नाहीत, असे सिद्ध केले आहे असा दावा एस. वाय. कुरेशी यांनी केला आहे.
मूळात कुरेशी आणि शेख हे मुस्लिम उच्च पदस्थ पूर्वी संपुर्णपणे लव्ह जिहाद नावाच्या संकल्पनेचे अस्तित्वच नाकारत होते, ते आता लव्ह जिहाद वरून बोलायला लागले आहेत. पण यात देखील अतिशय चलाखीने ते स्वतःचे तर्कट मांडत आहेत. यात सरळ सरळ मुस्लिम मुलींच्या दृष्टिकोनातून लव्ह जिहाद कडे कोणी पाहिलेच नाही किंवा तथाकथित लोकसंख्येचे गणितीय मॉडेल असे “स्वनिर्मित उच्चकोटीचे” युक्तिवाद ते करत आहेत. त्याचबरोबर लव्ह जिहाद सारखी प्रकरणे केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी राज्यातून समोर आली असताना, अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असताना गयासुद्दीन शेख यांच्यासारख्या आमदाराने फक्त 100 प्रकरणांचा दावा करत स्वतःची माहिती स्वतःच्या पद्धतीने सादर केली आहे…!!
मात्र ही आकडेवारी नेमकी कुठून आली कशी घेतली? ही आकडेवारी अधिकृत आहे का? त्याचा सोर्स काय? तो कोणी तपासला? याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यातून फक्त लव्ह जिहाद सारखी वस्तुस्थिती नाकारण्याचा हा वेगळा मुस्लिम बुद्धिवादी पॅटर्न दिसून येत आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App