
बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी याच्या ताब्यातून पुणे सायबर पाेलीसांनी चाैकशी दरम्यान सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेला आराेपी माजी आयपीएस अधिकारी याच्या ताब्यातून पुणे सायबर पाेलीसांनी चाैकशी दरम्यान सहा काेटी रुपयांची क्रिप्टाे करन्सी जप्त केली आहे. पाटील याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टाे करन्सीचे वाॅलेट काढून त्यात आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन वर्ग केल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. Bitcoin fraud case pune cyber police seized २३६ cripto currency from ex IPS
रविंद्र पाटील याचे अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण झालेले असून ताे सन २००२ बॅचचा केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत उत्तीर्ण हाेऊन त्याला जम्मू-काश्मीर कॅडेर मिळाले हाेते. मात्र, आयपीएसच्या नाेकरीत पाटील याचे मन रमले नाही अाणि अल्पावधीत त्याने राजीनामा देऊन खासगी कंपनीत ताे रुजू झाला. आतरराष्ट्रीय स्तरावरील के.पी.एम.जी. या नामांकित कंपनीत ताे ई-डिसकव्हरी, सायबर तज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर काम करत हाेता. त्याचप्रमाणे चीन मध्ये हाँगकाँग येथेही काही काळ त्याने काम केले.
पुणे पाेलीसांकडे सन २०१७ मध्ये अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचे विराेधात दत्तवाडी व निगडी पाेलीस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकाॅईनच्या गुन्हयात पुणे पाेलीसांनी सायबर तज्ञ म्हणून काम करत हाेता. मात्र, यादरम्यान त्यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करताना, आराेपींच्या खात्यावरील क्रिप्टाे करन्सी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकाॅईन असल्याचे स्क्रीनशाॅट दाखविल्याचे केवायसीच्या रिपाेर्ट मधून दिसून आले आहे. आतापर्यंत रविंद्र पाटील याने २३६ बीटकाॅईन इतरत्र वळविल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीटकाॅईन गुन्हयातील पैशातून त्याने वेगवेगळया ठिकाणी गुंतवणुक केल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबत पाेलीस सखाेल चाैकशी करत आहे.
पंकज घाेडेची परदेशात गुंतवणुक
सदर गुन्हयातील आराेपी पंकज घाेडे हा ग्लाेबल ब्लॅकचेन फाऊंडेशन कंपनी चालवत हाेता. सायबर तज्ञ म्हणून पाेलीसांसाेबत काम करताना त्याने ही आराेपींच्या खात्यातून बीटकाॅईन इतरत्र वळवून फसवणुक केली आहे. आराेपींच्या खात्यावर बिटकाॅईन शिल्लक असतानाही बिटकाॅईन नसल्याचे स्क्रीनशाॅट त्याने पाेलीसांना दिले असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या क्रिप्टाे करन्सी वाॅलटच्या तपासणीत त्याने हजाराे युराे, डाॅलरचे आर्थिक व्यवहार परदेशात केल्याचे दिसून आले असून याबाबत पाेलीस तपास करत आहे. वेगवेगळया क्रिप्टाे करन्सीत त्याने गुंतवणुक केल्याचा पाेलीसांना संशय आहे.अल्पावधीत काेटयावधी रुपयांच्या चार ते पाच वेगवेगळया कंपन्या त्याने सुरु केल्या हाेत्या मात्र त्याचे आयकर विभागाकडे काेणतेही रिर्टन त्याने भरले नसल्याचे उघड झाले असून यासंर्दभात चाैकशी करण्यात येत आहे.
Bitcoin fraud case pune cyber police seized २३६ cripto currency from ex IPS
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारताची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, सॉफ्टवेअरने वाढवली रेंज
- विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह
- काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले