वृत्तसंस्था
मुंबई : राम नवमी आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली.Allow processions aon the occasion of Ram Navami and Gudipadva
राज्यावर कोरोनाचं संकट कोसळल्यानंतर राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक निर्बंध लागू केले. करोना रुग्णांची संख्या जसजशी कमी होऊ लागली, तसे राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले. जानेवारी २०२२ पासून राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.
मार्चमध्ये तर राज्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या शंभराच्या खालीही आली आहे. तर मृत्यूचा आकडाही मार्चमध्ये आतापर्यंत पाच ते सहा वेळा शून्यावर आला आहे. त्यामुळे करोना पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही निर्बंध शिथिल केले आहेत. सर्व व्यवहार आता पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होऊ लागले आहेत.
त्यामुळे आगामी काळात येणारे सण उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे व्हावेत, असे अनेकांना वाटते. येत्या काही दिवसांत राम नवमी आणि गुढीपाडवा हे सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त मिरवणुका आणि शोभायात्रा काढण्यात येतील. त्यांना राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App