वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात रामपुरहाट मधील एका गावात जिहादी दहशतवाद्यांनी 13 लोकांना जिवंत जाळण्याचा घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. कोलकत्ता हायकोर्टाने याची दखल घेऊन ममता बॅनर्जी सरकारला दणका दिला आहे.Bengal Jihadi Terrorism: Mamata Banerjee 13 burnt alive in Rampurhat
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामपुरहाट मध्ये जाऊन मृतांच्या नातेवाइकांचे भेट घेतली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्या या दौर्यापूर्वी प्रचंड पोलिस पोलिस फौजफाटा घेऊन पोलिस महानिरीक्षकांनी संपूर्ण गावाची पाहणी केली.
कोलकता हायकोर्टाने रामपुरहाट मधल्या जिहादी हिंसाचाराची दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळावर म्हणजे जेथे घरे पेटवून लोकांना जिवंत जाळले तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणत्याही प्रकारे पुराव्यांशी छेडछाड होता कामा नये, असे बजावले आहे. तेथे आज सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे बसवल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली.
– अमित शहा यांची भेट
एकीकडे ममता बॅनर्जी प्रत्यक्ष घटनास्थळावर असताना दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आणि त्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये लोकसभेतील सर्व खासदारांचा समावेश होता.
खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या परिस्थिती व्यवस्थित हाताळत असताना राज्यपाल त्यांच्यावर टीका करत आहेत. ते कारभारात हस्तक्षेप करत आहेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर 21 लोकांना अटक केली आहे. कोणत्याही परिस्थितीत दोषी व्यक्तींना मोकाट सोडण्यात येणार नाही, असे खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App