दुकानदाराला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक

आंबेगाव परिरातील दुकानात शिरून दुकान मालक, कामगार यांना मारहाण करणाऱ्या तीघा आरोपींस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.Shopkeeper & worker beatan accused arrested by police with the help of CCTV footage


प्रतिनिधी 

पुणे –आंबेगाव परिरातील दुकानात शिरून दुकान मालक, कामगार यांना मारहाण करणाऱ्या तीघा आरोपींस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.Shopkeeper & worker beatan accused arrested by police with the help of CCTV footage

यश अजय पवार( नोकरी रा कात्रज अंजलीनगर), पंकज संजय दिवेकर ( नोकरी रा. खडके वस्ती बिबवेवाडी ), विशाल रामविलास गौतम ( नोकरी रा कात्रज फाटेआळी,कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहे. यातील यश हा फिर्यादीच्या दुकानात कामाला होता. मालकाशी वाद झाल्यानंतर त्याने काम सोडले होते.



फिर्यादी दिवेशकुमार जयसुखभाई गोडासरा (धंदा-व्यापार रा.एच/ लेकव्हीस्टा सोसायटी, दत्तनगर जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुा ) यांचे क्षमिक सेरा वर्ल्ड नावाचे दुकान आहे. ते दुकानामध्ये काम करीत असातना दि 13/ 3/ 2022 रोजी दुकानामध्ये 8 ते 9 अनोळखी मुलांनी आत मध्ये प्रवेश केला. काही कारण नसताना वाद घालून हाताने मारहाण केली.

तसेच दुकानातीलखुर्चा व पंख्याची तोडफोड करुन पळून गेले होते. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पथंकाचे अधिकारी नितीन शिंदे व अंमलदार तपास करत असताना अंमलदार सचिन पवार व सचिन गाडे व विक्रम सावंत यांना खबर मिळाली की, गुन्हयातील तीन आरोपी कात्रज परिसरामध्ये आहेत.

पथक तेथे रवाना झाले असता, आरोपी त्यांना बघुन पळू लागले. मात्र पाठलाग करुन त्यांना थोडयाच अंतरावर पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले सचिन पवार, हर्षल शिंदे, आकाश फासगे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सांवत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांचे पथकाने केली आहे.

Shopkeeper & worker beatan accused arrested by police with the help of CCTV footage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात