Shivsena – NCP Feud : “कवडीची न किंमत” आणि शिवसेना पोखरण्याच्या राष्ट्रवादीच्या कुरापती!!

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले खरे “रंग” दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या कारणासाठी हे सरकार अस्तित्वात आणले ते कारण आता परिपक्व व्हायला लागले असल्याचे यातून दिसून येत आहे. Shivsena – NCP Feud: “No price for Kavadi”

महाराष्ट्रात हिंदुत्ववादी मतदार वाढतोय ना… मग तो जातिवादातून पोखरून काढा. त्यासाठी दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये फुट पाडा आणि मग मागच्या दाराने पूर्ण सत्ता बळकवा. हाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा अर्थात शरद पवारांचा मनसूबा राहिला आहे. मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादीने शिवसेना पोखरायच्या याच कुरापती चालू केल्या आहेत. आधीच अर्थमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी वाटपात झुकते माप देऊन त्यांचे भांडवलीकरण करून ठेवले आहे. त्याच वेळी शिवसेना आमदारांमध्ये निधी वाटपातून असंतोष निर्माण करून ठेवला आहे. तर आता शिवसेनेने वर्षानुवर्षे जिंकून आपल्या कडे राखलेले मतदारसंघ देखील पोखरायचा डाव मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने रचण्यात येतो आहे.

– शिवसेनेचा सातत्यपूर्ण विजय

मावळ मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला तेव्हापासून लोकसभेत फक्त शिवसेनेचा आज प्रतिनिधी तेथेन निवडून आला आहे. आधी खासदार गजानन बाबर आणि नंतर श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे मावळमधून खासदार राहिले आहेत. अशा स्थितीत ज्या पार्थ पवार यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही असे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या नातवासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याकडून पुढे करून पवारांनी शिवसेना पोखरण्याचाच डाव टाकला आहे…!!



– श्रीरंग बारणे यांना हैराण करण्याचा डाव

श्रीरंग बारणे यांना पुढच्या काही महिन्यांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या पुढे सोडून हैराण करण्यात येईल. त्यांना शिवसेनेत राहणे मुश्किल करण्यात येईल आणि त्यांना शिवसेनेतून फोडून राष्ट्रवादीचा अथवा भाजपचा मार्ग पकडायला लावण्यात येईल. हा तो पवारांचा डाव आहे. अशा स्थितीत श्रीरंग बारणे कोणत्या पद्धतीने निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले असेल, पण खरा निर्णय श्रीरंग बारणे यांनी घेण्यापेक्षा तो मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेणे अपेक्षित आहे. शिवसेनेचे 25 ते 30 आमदार नाराज आहेत. आता गजानन कीर्तिकर आणि श्रीरंग बारणे यांच्या रूपाने लोकसभेचे विद्यमान खासदारही उघडपणे राष्ट्रवादी विरोधात मैदानात आले आहेत. अशा वेळी आपल्याच आमदार-खासदारांचे हित जपणे हे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे कर्तव्य नाही का…??, असा सवाल करण्यात येतो आहे. म्हणायला ठाकरे सरकार लाभ घेते पवार सरकार इथपर्यंत म्हणण्याइतपत गजानन कीर्तीकर यांच्यासारख्या वरिष्ठ खासदाराला वेळ येते आणि शिवसेना सलग जिंकत असलेला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांसाठी सोडा असे सांगण्याची एखाद्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हिंमत होते यातच सत्तेचा गैरफायदा कोण घेतो आहे हे दिसून येते…!!

पवारांचे रेटारेटी – फोडाफोडीचे राजकारण

पवारांनी आत्तापर्यंत आपल्या राजकीय आयुष्यात याच पद्धतीचे रेटारेटीचे फोडाफोडीचे राजकारण केले आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. शिवसेना विरोधी पक्षात होती तेव्हा छगन भुजबळ यांच्या रुपाने पवारांनी शिवसेना फोडली. आज शिवसेनेचा त्यातही ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री असताना पवार शिवसेनेला सुरुंग लावत आहेत. ही वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिसत नाही का…??, असा सवाल शिवसेनेचे आमदार आणि खासदार करू लागले आहेत. शरद पवारांनी ज्या नातवाला कवडीचीही किंमत दिली नाही त्या नातवासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची भाषा करण्याइतपत राष्ट्रवादी हिंमत आणि चलाखी करते आहे. यातच पवारांच्या राजकारणाचे खरे इंगित दडले आहे.

Shivsena – NCP Feud: “No price for Kavadi”

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात