वृत्तसंस्था
वारसॉ : रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी युक्रेनचा शेजारी देश पोलंड दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. Russia – Ukraine War: Joe Biden Takes Big Risk! will visit Ukraine’s neighboring Poland on 25 march
या युद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युद्ध थांबविण्यासाठी पोलंडला रवाना होत आहेत. रशियाने युक्रेनवर भीषण हल्ले सुरुच ठेवले आहेत. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांनी युद्धभूमी सोडली असून त्यांनी शेजारच्या देशांमध्ये आसरा घेतला आहे.
कीव्ह अमेरिका आणि नाटोचे देश शस्त्रास्त्रे पुरवत असल्याने पडत नाही. याचा रशियाला प्रचंड राग असून दोन दिवसांत युक्रेन पाडण्याचे मनसुबे रचणारे पुतीन पुरते घायाळ झाले आहेत. आता युद्ध अशा वळणावर येवून ठेपले आहे की, ते थांबविताही येणार नाही आणि न थांबल्यास तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
अशातच युक्रेनच्या मदतीसाठी तप्तर असलेल्या पोलंडमध्ये जाण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला आहे. येत्या २५ मार्चला बायडेन पोलंडची राजधानी वारसॉला जाणार आहेत. युद्धाने धगधगती युक्रेनची सीमा तेथून जवळ आहे. रशियाची सीमा जरी पोलंडला लागून नसली तरी रशियाचा मित्र बेलारुसची सीमा पोलंडला लागून आहे. येथे बायडेन पोलंडचे अध्यक्ष आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App