20 मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांची झपाट्याने कमी होत असलेली संख्या पाहता या लहानशा पक्ष्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने या दिनाचे आयोजन केले जात असते. माेबाईल टाॅवरमधून निघणारे इलेक्ट्राेमॅग्नेटिक तरंग हे मानवी आराेग्यासह प्राणी व पक्ष्यांच्याही आराेग्यास हानिकारक आहेत, हे आता प्रयाेगानिशी सिद्ध झाले आहे. मनुष्यासाठी सर्वात लाडकी असलेली चिऊताईसुद्धा माेबाईल टाॅवरच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीची बळी ठरत आहे.
जगातील विविध देशांत झालेल्या अभ्यासानुसार 2000 ते 2020 पर्यंत 20 वर्षांत चिमणीच्या संख्येत 30 ते 50 टक्के घट झाली आहे व यासाठी रेडिएशन हेही एक माेठे कारण आहे.
चिमण्यांचे संवर्धन करण्यासाठी आपल्या घराच्या समोर, बाल्कनीत जिथे शक्य असेल तिथे, लहानसे घरटे लटकवून द्या. ते तुम्ही घरी बनवू शकता किंवा विकतही घेऊ शकता. त्या घरट्याजवळ लहानशा ताटलीत दररोज धान्य व पाणी ठेवत जा. काही दिवसात तिथे चिमण्यांची झुंबड उडालेली तुम्हाला दिसेल. घरटे लावणे शक्य नसेल तर किमान धान्य व पाणी दररोज देत जावे. उन्हाळा सुरू झाला आहे. पक्ष्यांना पाण्यासाठी खूप लांब जावे लागू नये याकरिता ही माणुसकीची पावले तर नक्कीच उचलली जाऊ शकतात. World Sparrow Day :Come back these sparrows… Today is World Sparrow Day: Let’s all call together the darling ‘Chiu’
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : चिऊताई,चिऊताई दार उघड…,चिमणे चिमणे ये गं …., अशा चिऊताईचे गोड गाणे ऐकत आपण सर्वच लहानाचे मोठे झालो. लहान बाळाला घास भरवताना आजी, आई, ताई हा चिऊचा घास म्हणून भरवायची. जणू ती आपल्या घरातीलच एक सदस्य आहे.
पर्यावरणाच्या सुरक्षा साखळीत महत्त्वाचा घटक असलेल्या या चिमणीचे अंगण, परसातील झारावर, घराच्या ओसरीत, फोटोमागे हमखास घरटे असायचेच. पण, एव्हाना हा लहान पक्षी सिमेंटच्या जंगलात दिसेनासा झाला आहे.या चिमण्यांनो परत फिरा रे…असेच आता म्हणावे लागणार.
ग्रामीण भागात अजूनही आढळणारी चिमणी, शहरातील इमारतींच्या जंगलात जशी लोप पावत आहे, तशीच दिवसेदिवस दिसेनाशी होत आहे. मातीची घरे आता नावाला उरली आहेत. बांबूच्या ओसऱ्या आता फारच कमी उरल्या आहेत. अंगण परसातील घनदाट झाडी, वेली, फुलांचे मळेही दिसेनासे झाले आहेत.
यांच्याच आधाराने चिमण्यांची सुमारे 10 वर्षांपूर्वीपर्यंत मनुष्याभोवती वागणे असायचे. मात्र आता महिन्या दोन महिन्यातून एखादवेळी एखादी चिमणी दृष्टीस पडते. त्यावेळी आपल्या मुलांना ती बघ चिमणी म्हणून एखादी दुर्मिळ गोष्टीप्रमाणे ती दाखवावी लागते.
चिऊताई बघता बघता दुर्मिळ पक्षी चिमणी बनली त्याला मनुष्यच कारणीभूत आहे. त्यामुळे या चिमण्यांसाठी दाणे असलेले दाणेपात्र, पाणी पात्र तो आवर्जून गॅलरी, घरातील एखादे मोठे झाड, गच्चीवर ठेवत आहे. परंतु, रागावलेले चिऊताई एवढ्या सहज पुन्हा आपले नाते मनुष्याशी जुळवेल असे वाटत नाही. कारण या पात्रांकडेच नव्हे तर पाणी पिण्यासाठीही ती आताशा येईनाशी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App