विशेष प्रतिनिधी
नागपूर : सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच मोहन भागवत यांची भेट घेतली.Everyone who is in search of truth should watch The Kashmir Files, appeals Sarsanghchalak Mohan Bhagwat
यावेळी भागवत यांनी हा चित्रपट केल्याबद्दल दोघांचे कौतुक केले. चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. काश्मिरी पंडितांचे सत्य समोर आणण्यासाठी बरेच संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना सत्याची भूक आहे व जे सत्याच्या शोधात आहेत, त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटावरुन देशभरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे विरोधक आणि समर्थक असे दोन गट पडलेले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या चित्रपटाने दडलेले सत्य समोल आणले, असे म्हणत चित्रपटाचे समर्थन केले होते.
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीदेखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. सत्याच्या शोधात असणाºया प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशसह अनेक भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटाला देशभरात जोरदार प्रतिसादही मिळत आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App