वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने १७ मार्च अखेर सर्वाधिक कर संकलन करण्याचा विक्रम केला आहे. १३. ६३ लाख कोटींचे कारसंकलन केले असून ते गत वर्षीच्या तुलनेत ४८ टक्के अधिक आहे. Record jump in income tax collection; 13.63 lakh crore, 48 per cent higher than last year
याबाबतची माहिती देताना सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) चे अध्यक्ष जे. बी. महापात्रा यांनी गुरुवारी सांगितले की, आयकर विभागाने (आय-टी विभाग) आपल्या इतिहासात सर्वाधिक कर संकलन नोंदवले आहे. ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात ४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात आगाऊ कर संकलनाच्या डेटाचाही समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात आगाऊ कर भरणा ४१ टक्क्यांनी वाढला आहे.
महापात्रा यांनी सांगितले की, आजपर्यंत प्रत्यक्ष करांचे निव्वळ संकलन १३.६३ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण ४८ टक्के अधिक आहे. ते म्हणाले की वार्षिक आधारावर निव्वळ संकलन २०-२१ च्या याच कालावधीपेक्षा ४८.४ क्के जास्त आहे. ते १९-१० च्या तुलनेत ४२.५ टक्के जास्त आणि १८-१९ पेक्षा ३५ टक्के जास्त आहे.
“हे आधीच्या सर्वोच्च थेट कर संकलनाच्या आकड्यापेक्षा २.५ लाख कोटी रुपये जास्त आहे. विभागाच्या इतिहासातील आयकर संकलनाचा हा सर्वोच्च आकडा आहे,” असे महापात्रा म्हणाले. ते म्हणाले, “जर तुम्ही ढोबळ आकडे बघितले तर आज ते रु. १५.५० लाख कोटी आहे.जे २०-२१ च्या आकडेवारीपेक्षा ३८.३ टक्के, १९-२० मधील ३६.६ टक्के आणि १८-१९मधील ३२.७ टक्के आहे. आमचे एकूण संकलन १२.७९लाख कोटी आहे. यावर्षी, आम्ही १५ लाख कोटींच्या ढोबळ आकड्यात प्रवेश केला आहे, जो विभागासाठी एक ऐतिहासिक उच्चांक आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App