राष्ट्रवादी, शिवसेनेचा अपशकून असूनही गोव्यात पर्रीकरांवरून अधिक यश, नितीन गडकरी यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

गोव्यात भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आले असे सांगत गोव्यातील भाजपच्या विजयासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. पर्रीकरांच्या काळातही इतर पक्षांचं समर्थन घ्यावं लागत होतं असं ते म्हणाले.In Goa, despite the misfortune of NCP and Shiv Sena More success than Parrikar, Nitin Gadkari praised Devendra Fadnavis


विशेष प्रतिनिधी

नागपूर – गोव्यात भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आले असे सांगत गोव्यातील भाजपच्या विजयासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. पर्रीकरांच्या काळातही इतर पक्षांचं समर्थन घ्यावं लागत होतं असं ते म्हणाले.

गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळापासून ते नितीन गडकरींच्या घरापर्यंत फडणवीसांची रॅली काढण्यात आली. यानंतर नितीन गडकरींच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी गडकरी म्हणाले, पाच राज्यांमध्ये झालेल्या या महत्वाच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपाला नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वात अभुतपूर्व यश मिळालं असून पक्षाचा आत्मविश्वास वाढवणारं आहे. अनेकजण पाच राज्यांमध्ये निवडणुका कठीण असल्याचं बोलत होते.

खासकरुन गोव्याच्या बाबतीतही बोललं जात होतं. मी १९९५ पासून तिथे काम करत आहे. अनुकूल स्थितीत असतानाही आपल्याला इतक्या जागा मिळाल्या नाहीत. पर्रीकर असतानाही आम्हाला इतरांचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. पण यावेळी गोव्याच्या जनतेने भाजपाला पूर्ण बहुमत दिलं. प्रभारी म्हणून फडणवीसांकडे नेतृत्व होतं. फडणवीस आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात गोव्यात अभुतपूर्व यश मिळालं असून यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”.

यावेळी गडकरींना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं की, “गोव्यात अनेक पक्ष उतरले होते. भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आलं. यानिमित्ताने हीदेखील एक चांगली गोष्ट घडली”.

In Goa, despite the misfortune of NCP and Shiv Sena More success than Parrikar, Nitin Gadkari praised Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात