वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही पक्षाच्या अख्या कार्यकारिणीने गांधी परिवाराची पाठराखणच केली, पण त्यात गांधी परिवाराने पराभवाचे खापर सर्व प्रदेशाध्यक्षांवर फोडून त्यांचे राजीनामे मागितले आहेत. Congress Debacle gandhi family sonia gandhi
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे ट्विट पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. सोनिया गांधी यांना संबंधित राज्यांच्या प्रदेश कार्यकारिणीची फेररचना करायची आहे. त्यामुळे सर्व प्रदेशाध्यक्षांना राजीनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेल सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
– राहुल प्रियांकाची जबाबदारी
वास्तविक उत्तर प्रदेश पंजाब उत्तराखंड गोवा आणि मणिपूर या सर्व राज्यांमध्ये प्रचाराची मुख्य धुरा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या हाती घेतली होती. त्यांनी सर्व राज्यांचे मोठे दौरेही करून मोठ्या प्रचार सभा घेतल्या होत्या. तरी देखील पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीची कालच नवी दिल्लीत बैठक झाली त्यामध्ये जी 23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद आणि अन्य नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशी मागणी केली त्याचबरोबर जी 23 मधील दुसरे नेते कपिल सिब्बल यांनी आता गांधी परिवाराने काँग्रेसचे नेते पदावरून बाजूला होऊन इतर नाही त्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
Congress President, Smt. Sonia Gandhi has asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCC’s. — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
Congress President, Smt. Sonia Gandhi has asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCC’s.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 15, 2022
– सोनियांनी उगारली काठी
या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्ष कार्यकारिणीने गांधी परिवाराची कालच्या बैठकीत पाठराखण केली पण या बैठकीला 24 तास उलटूनही गेले नाहीत तोच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच प्रदेशाध्यक्षांना अध्यक्षपदावरून डच्चू देण्यासाठी काठी उगारली आहे. काँग्रेसच्या पराभवाचे सगळे खापर प्रियंका अथवा राहुल यांच्यावर न फोडतात सर्व प्रदेशाध्यक्षां फोडण्यात आले आहे. त्यामुळे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लु, उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष लोकेन सिंह यांना राजीनामा द्यावा लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App