प्रतिनिधी
मुंबई : काश्मिरी हिंदूंचे 1990 च्या दशकात झालेले भयानक शिरकाण हा अतिशय गंभीर विषय मांडणारा चित्रपट “द काश्मीर फाइल्स” याच्याविरोधात एकीकडे “फिल्म जिहाद” सुरू झाला असताना दुसरीकडे मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांनी सिनेमा करमुक्त केला आहे. आता हीच मागणी महाराष्ट्रातून देखील पुढे आली आहे. हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रवीण दटके यांनी आज विधानसभेत केली आहे. The Kashmir Files goa bhiwandi fild jihad
– गोवा आणि भिवंडीत “फिल्म जिहाद”
काश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी गोवा आणि भिवंडीत “फिल्म जिहाद” पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. थिएटरमध्ये जागा शिल्लक असताना हाऊसफुल्लचे खोटे बोर्ड लावणे तसेच धर्मांध मुस्लिमांनी बल्कने तिकिटे खरेदी करून चित्रपट पाहण्यापासून हिंदूंना रोखणे असले प्रकार पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात “द काश्मीर फाइल्स” चित्रपट करमुक्त करण्याच्या मागणीला जनतेचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
– सेक्युलर पोटदुखी
‘द काश्मीर फाईल्स’ हा केवळ चित्रपट नसून सत्य परिस्थिती आहे. परंतू ही सत्य परिस्थिती काही सेक्युलर मंडळींना आवडलेली दिसत नाही. त्याचमुळे सिनेमाचे पोस्टर काढून टाकणे, सिनेमा सुरू असताना जाणीवपूर्वक आवाज बंद करणे, प्रेक्षकांना अडवणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आमची मागणी आहे की चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी.
– शिवसेनेची भूमिका काय?
बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांविषयी वेळोवेळी सहानुभूती दर्शवली आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की ‘द काश्मीर फाईल्स’सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करावा, असे प्रवीण दटके म्हणाले आहेत. अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला “द काश्मीर फाइल्स” हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App