प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडण्यावरून माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही निलेश राणे यांचा संशय कायम असून त्यांनी आपल्या आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. Pawar – Dawood – Malik nitesh rane nilesh rane
नवाब मलिक हे तरी दुसरे-तिसरे असतील, माझा संशय आहे की शरद पवार हेच दाऊद महाराष्ट्रातली पहिला माणूस आहे, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करून शरद पवार हेच दाऊदचा माणूस असल्याचा संशय कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा. आम्ही हे म्हणतच राहणार की पवार हे दाऊदचा माणूस आहेत. आम्ही संशय देखील व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल देखील निलेश राणे यांनी केला आहे.
Nawab Malik : मुख्यमंत्र्यांवर दाऊदचा दबाव आहे का?; नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा उद्या मोर्चा!!
– राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा!!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडण्याच्या मुद्द्यावर राणे बंधूंविरोधात मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुरेश चव्हाण या व्यक्तीने याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधताना राणे बंधूंनी पवारांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला. असा संबंध जोडल्यामुळे राणे बंधूंविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही तक्रार दिली आहे.
– राष्ट्रवादीची तक्रार
शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडून जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा डाव असल्याचा आरोप एफआयआर मध्ये केला आहे. आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत?, अशी विचारण शरद पवारांना केली होती. वास्तविक नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
– नवाब मलिक कोण लागतो?
निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस असल्याचे ट्विट केले होते. पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्याने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे.
– पवारांच्या जीवाला धोका
नितेश राणे आणि निलेश राणे हे बंधू जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करून तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसानी करत आहेत. दाऊदशी संबंध जोडल्याने शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असेही सुरज चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App