विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने नाराज नेत्यांच्या जी-२३ नेत्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. पक्षाच्या खराब कामगिरीनंतर नेतृत्व बदल आणि संघटनेत आमूलाग्र बदलाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. या नेत्यांची ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी बैठक झाली.G-23 group of disgruntled leaders rises again after Congress’s defeat, demands change in party leadership
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत चर्चा करण्यासाठी जी-२३ ची बैठक बोलवण्यात येणार आहे. हे नेते काँग्रेस पक्षातील नेतृत्त्व बदल आणि इतर गोष्टींमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करणार आहेत.
जी-२३ ने सुमारे दोन वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनेत बदलासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला होता. यावेळी काही गांधीनिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. सोनिया गांधी यांनी त्यांची समजूत काढली.
मात्र, आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये पक्षाला कोणतीही उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नसून पंजाब वगळता चार राज्यांत भाजपची सत्ता कायम राहिली आहे.
पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव दुदैर्वी असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे. मात्र, लवकरच काँग्रेस पुन्हा जनतेचा विश्वास जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App