देशातील पाच राज्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात प्रभावी कामगिरी करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले आहे. या विजयाचा जल्लोष पुणे भाजपकडून साजरा करण्यात आला. Pune BJP Members celebrate victory in four states
विशेष : प्रतिनिधी
पुणे : पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालात चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा ठरल्याने पुण्यातील भाजप कार्यकर्तेनी मंगला टॉकीज जवळील भाजप कार्यालयाबाहेर एकत्र जमून जल्लोष साजरा करत एकमेकांना लाडू भरवले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, गणेश घोष यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजपची वाटचाल पुन्हा एकदा प्रभावी राहिल्याचे निवडणुकींच्या निकालातून दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, गोवा ,मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक मते मिळाली असून भाजप उमेदवारांची संख्या प्रथम क्रमांकावर राहिली आहे.
सदर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीतही भाजप सर्वाधिक जागांवर विजय होऊन सत्ता स्थापन करेल अशी आम्हाला अशा आहे. भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी चार राज्यांमध्ये अखंड परिश्रम केले त्यांचे मी अभिनंदन करतो. निवडणुकीत काँग्रेसच्या घराणेशाहीला पुन्हा एकदा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले, याबाबत काँग्रेसने विचारमंथन करणे गरजेचे आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
https://youtu.be/qGzPBuuE5eQ
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App