विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युध्दाचा भारताला फायदा होणा आहे. या युध्दामुळे जगभरात गव्हाची टंचाई निर्माण झाली असून भारतातून ७० लाख टन गहू निर्यात हाण्याची शक्यता आहे.सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे.India benefits from Russia-Ukraine war Wheat exports will reach 7 million tonnes
तसेच जागतिक बाजारपेठेत गव्हाचे भाव देखील वाढले आहे. ही सर्व परिस्थिती भारताला गव्हाच्या नियार्तीसाठी अनुकूल आहे. याबाबत बोलताना अन्न व ग्राहक मंत्रालयाच्या अधिकाºयाने सांगितले की, भारतातून गव्हाची निर्यात वाढत असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत 6.6 मिलियन टन गव्हाची निर्यात करण्यात आली आहे. भारत रशियानंतर जागातील दुसºया क्रमांकाचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात ठप्प झाली आहे. रशिया हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. तर युक्रेनचा गव्हाच्या उत्पादनामध्ये तिसरा क्रमांक लागतो. भारत रशियानंतर जगात दुसºया क्रमांकावर आहे. दरवर्षी रशिया आणि युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होते.
दोन देश मिळून जवळपास जागतिक स्थरावर तीस ते चाळीस टक्के गव्हाची निर्यात करतात. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने निर्यात ठप्प आहे. या सधींचा भारताला फायदा होऊ शकतो. भारतातून गव्हाची निर्यात वाढत आहे.दरवर्षी भारताकडून अफगानिस्तानला देखील 50,000 टन गहू निर्यात केला जातो.
मात्र यंदा अफगानिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आहे. तरी देखील त्यांना गव्हाची निर्यात केली जाईल. अफगानिस्तानमध्ये मोठ्याप्रमाणात अन्नधान्य टंचाई आहे. ती भरून काढण्यासाठी भारतातून गव्हाची निर्यात केली जाते. सध्याची एकूण परिस्थिती पहाता आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गंत स्थरावर गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App