विशेष प्रतिनिधी
न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले होते. हे आव्हान गाठताना पाकिस्तानी संघाला अवघ्या १३७ धावा करता आल्या. फक्त ४३ षटकांमध्ये पाकिस्तानचा पूर्ण संघ बाद झाला. India beat Pakistan in Women’s World
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. राजेश्वरी गायकवाडने चार फलंदाजांना बाद करुन भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. झुलन गोस्वामी, स्नेह राणा, यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर मेघना सिंघ आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
सुरुवातीला १२० धावांमध्ये पाच फलंदाज तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ २०० धावातरी करु शकणार का अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र पूजा वस्त्रकर आणि स्नेह राणा यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी १२२ धावांची शतकी भागिदारी केल्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानपुढे २४४ धावांचा डोंगर उभा करु शकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App