प्रतिनिधी
पुणे : नरेंद्र मोदी यांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले यावेळी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही वादाचा नव्हे, तर फक्त विकास कामांचा उल्लेख करीत नेहमी त्याच मुद्द्यांवर भर दिला. PM Modi Pune Metro: Not on any controversy in Prime Minister Narendra Modi’s speech; So focus only on development !c
पंतप्रधानांनी सुरूवातीलाच पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचा आढावा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ कृष्ण गोखले, चाफेकर बंधू यांचा यांना अभिवादन केले.
त्याच वेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकार या वादावर तसेच राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर कोणतेही वक्तव्य करून न करता फक्त विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला.
A boost to urban infra Pune. Watch. https://t.co/9X3mvgEpYm — Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
A boost to urban infra Pune. Watch. https://t.co/9X3mvgEpYm
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
देशात मध्ये 60 टक्क्यांपर्यंत शहरीकरण होत असताना स्वच्छ ऊर्जा शहरांचा संतुलित विकास यावर भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर श्रीमंत लोकांनी केला पाहिजे, या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान राज्यपाल भगतसिंग यांचे नाव न घेता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधांबद्दल कथित स्वरूपातले वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्याबद्दल तक्रार केली होती. परंतु या गोष्टीची पंतप्रधानांनी दखल न घेता आपल्या भाषणाचा भर फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर ठेवला. पूर्वीच्या काळात विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात व्हायची पण विकास कामे वेळेत पूर्ण करणे आणि त्याचे उद्घाटन करणे याकडे मात्र दुर्लक्ष व्हायचे. आज काळ बदलला आहे. पुणे मेट्रोचे भूमिपूजन माझ्याच हस्ते झाले आणि उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे. याचा अर्थ वेळेत काम करण्याची संस्कृती आता रुजते आहे, अशा स्वरुपाची टिपणी पंतप्रधान मोदींनी केली.
रामभाऊ म्हाळगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण
पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या भाषणात माजी खासदार आणि जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आठवणी जागवल्या. रामभाऊ म्हाळगी यांची आज पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मला आठवण येते आहे, अशा भावना पंतप्रधान मोदींनी बोलून दाखविल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App