विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारताची शक्ती वाढली आहे. नवी ताकद म्हणून भारत जगात उदयास येत आहे. त्यामुळेच आपले सरकार युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांना परत आणू शकले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. युक्रेनमधील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.We have been able to bring back the citizens of Ukraine only with the increase of India’s power, Prime Minister Narendra Modi has made it clear
सोनभद्र येथे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात प्रचार करताना पंतप्रधान बोलत होते. रशियाच्या हल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या तीन दिवसांत चार उच्चस्तरीय बैठका घेऊन तेथील परिस्थितीवर चर्चा केली. ऑपरेशन गंगा अंतर्गत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
युक्रेनमध्ये रशियन आक्रमणाच्या सुरुवातीला अडकलेल्या विद्यार्थ्यांसह अंदाजे 20,000 भारतीयांपैकी 60 टक्के लोकांनी युक्रेनच्या सीमा ओलांडल्या आहेत. उर्वरित लोकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू असताना ते सुरक्षित आहेत, असे केंद्राने म्हटले आहे. सरकारने चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत म्हणून निर्वासन प्रयत्नांवर देखरेख करण्यासाठी पाठवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App