विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. चार मार्चपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. Chakkajam of Swabhimani all over Maharashtra on March 4; Demand for daily power supply to farmers
महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येणाऱ्या चार फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना सार्वजनिक कामात सहभागी होऊ देणार नाही असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App