रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युक्रेनमध्ये युद्धासाठी अमेरिकन सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियन लढायला तयार असतील, पण अमेरिका लढायला तयार नाही, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी सैन्य पाठवण्यासही बायडेन यांनी नकार दिला आहे. पण युक्रेन-रशियाच्या मुद्द्यावर युक्रेनला पाठिंबा देणारी अमेरिका सैन्य का पाठवत नाही? त्यामागची कारणे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.Here are five key reasons why Biden did not send troops after the Russian invasion of Ukraine
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने युक्रेनमध्ये युद्धासाठी अमेरिकन सैन्य पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियन लढायला तयार असतील, पण अमेरिका लढायला तयार नाही, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी सैन्य पाठवण्यासही बायडेन यांनी नकार दिला आहे. पण युक्रेन-रशियाच्या मुद्द्यावर युक्रेनला पाठिंबा देणारी अमेरिका सैन्य का पाठवत नाही? त्यामागची कारणे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.
अमेरिकन सुरक्षा हित नाही
सर्वात महत्त्वाचे म्हणजे युक्रेन हा अमेरिकेचा शेजारी नाही. युक्रेनमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ नाही. युक्रेनकडे तेलाचे साठे नाहीत आणि युक्रेन हा अमेरिकेचा प्रमुख व्यापार भागीदार नाही. तसेच युक्रेन नाटोचा सदस्यही नाही. अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या पलीकडे लष्करी हस्तक्षेप करत असली तरी अफगाणिस्तानातून परतल्यानंतर, युद्धाच्या प्रकरणांमध्ये लगेच अडकू नये यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे.
बायडेन यांचा लष्करी हस्तक्षेपास नकार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन लष्करी हस्तक्षेप टाळत आहेत. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या लष्करी शक्तींचा वापर करण्याबाबत त्यांनी काळजी घेतली आहे. त्यांनी लिबिया आणि अफगाणिस्तानमध्ये सैन्य वाढवण्यास विरोध केला.
अमेरिकन नागरिकांनाही युद्ध नको
बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे की, एपी-एनओआरसीच्या सर्वेक्षणानुसार, 72 टक्के लोकांनी रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिकेने कोणतीही भूमिका बजावू नये किंवा फारच छोटी भूमिका बजावावी असे म्हटले आहे. तिसऱ्या देशासाठी रशियासारख्या बलाढ्य देशाशी युद्ध अमेरिकेला नको आहे.
महासत्तांची लढाई
जो बायडेन यांनी नुकतेच म्हटले आहे की, आम्ही दहशतवादी संघटनेशी लढण्याबद्दल बोलत आहोत असे नाही. आम्ही जगातील सर्वात मोठ्या सैन्यासोबत लढण्याबद्दल बोलत आहोत. ही खूप कठीण परिस्थिती आहे आणि ती लवकरच बिघडू शकते. बायडेन रशियाच्या अण्वस्त्रांच्या साठ्याचा संदर्भ देत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
युक्रेन आणि अमेरिका यांच्यात कोणताही सुरक्षा करार नाही
युक्रेनवर कोणताही सुरक्षा करार नाही जो अमेरिकेला जोखीम घेण्यास बाध्य करतो. नाटो देशांच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेची आहे पण युक्रेनची नाही. कारण युक्रेन नाटोचा सदस्य नाही. इथे एक गोष्ट नक्की आहे की, युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करू नये असे पुतीन वारंवार सांगत आहेत आणि नाटोने पुतीन यांच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App