जगाला महायुध्दाच्या उंबरठ्यावर आणणारा नेता इलॉन मस्क पेक्षाही श्रीमंत, ४३ विमाने, १५ हेलिकॉप्टर, सात हजार मोटारी आणि अब्जावधीची संपत्ती

विशेष प्रतिनिधी

मॉस्को : जग महायुध्दाच्या उंबरठ्यावर आहे. शेअर बाजार कोसळत आहेत. महागाई वाढत आहें. पण यासाठी जबाबदार असलेला नेता जगातील नेता आलिशान जीवन जगत आहे. जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्कपेक्षाही श्रीमंत असलेल्या या नेत्याकडे ४३ विमाने, १५ हेलिकॉप्टर, सात हजार मोटारी आणि अब्जावधीची संपत्ती
आहे.Even richer than Elon Musk, the leader who brought the world to the brink of World War II, 43 planes, 15 helicopters, 7,000 cars and billions of dollars.

युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे नाव सध्या जगभर चर्चेत आहे. रशियन गुप्तचर संस्था केजीबीचे गुप्तहेर राहिलेले पुतीन अतिशय धोकादायक आणि कठोर व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिध्द आहेत. मात्र, त्याचबरोबर ते प्रचंड श्रीमंतही आहेत.



पुतीन यांच्याकडे तब्बल ९६४१ अब्ज रुपये किंमतीचा सोन्याचा साठा, आलिशान गाड्या, खाजगी विमानांचा ताफा आणि अनेक गुप्त महाल आहेत. रशिया जगातील सर्वात आघाडीवर असणाºया सोने खरेदीदारांपैकी एक आहे. रशियाकडे मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग आणि येकातेरिनबर्ग या ठिकाणी सोन्याचा प्रचंड साठा आहे. मॉस्कोवर पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लादण्यात आले तर हा साठा मॉस्कोला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो.

रशियाकडे १९९५ मध्ये १.४ अब्ज पौंड (जवळपास १५२ अब्ज रुपये) किंमतीचा सोन्याचा साठा होता. पण आज पुतीन यांच्याकडे ९५ अब्ज पौंड (९६४१ अब्ज रुपये) किंमतीचा सोन्याचा साठा आहे. हे सोनं काही गुप्त ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.

जगात केवळ अमेरिका, जर्मनी आणि इटलीकडे रशियापेक्षा अधिक सोने आहे.रशियाकडे केंद्रीय बँकांमध्ये ४७२ दशलक्ष पौंड (४७ अब्ज रुपये) किंमतीच्या ठेवी आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे १६० अब्ज पौंडांचे म्हणजे १६ हजार २४१ कोटी रुपयांचे मालक आहेत.

त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या, सुपरयाचचा ताफा तसंच अनेक गुप्त महालं आहेत. पुतीन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरतात. कारण त्यांची एकूण संपत्ती जगातील सर्वात श्रीमंत पुरुष एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक ठरते. पुतीन यांच्याकडे ४३ विमाने, ७००० आलिशान गाड्या आणि १५ हेलिकॉप्टर आहेत.

यात एका लक्झरी प्रायव्हेट जेट विमानाचाही समावेश आहे. या विमानातील सोन्याच्या टॉयलेटची किंमत जवळपास ५० लाख रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. जवळपास ५ कोटी रुपयांच्या घड्याळांचा मोठा संग्रह असल्याचंही नेमत्सोव्ह यांचं म्हणणं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला दिसलेली पुतीन यांची सुपरयाचची किंमती ७ अब्ज रुपये आहे.ही सुपरयाच सध्या बाल्टिक समुद्रात आहे. पुतीन यांच्याकडे काळ्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ स्थित १०० अब्ज रुपये किमतींचा आलिशान राजवाडाही आहे.

Even richer than Elon Musk, the leader who brought the world to the brink of World War II, 43 planes, 15 helicopters, 7,000 cars and billions of dollars.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात