विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या संबंधावरून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मालिक यांना अटक झाली. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्यावरही दाऊदशी संबंध असल्याचा आरोप 25 वर्षापूर्वी झाला होता असा उल्लेख केला होता.Relationship with Dawood Ibrahim: What is the difference between the allegations against Sharad Pawar and Nawab Malik .
नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडून दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरू झाला. मात्र या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचा झालेला आरोप आणि नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप यात नेमका फरक काय…??, याचा धांडोळा घेतला असता अनेक बाबी स्पष्ट होतात.
पवारांवरचे आरोप
शरद पवार यांच्यावर झालेले सर्व आरोप हे दाऊद इब्राहिम चा मुंबई बॉम्बस्फोटात हात असल्याचा असल्याचे उघडकीस आल्यानंतर झाले होते. त्यावेळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा हे आरोप केले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याविरोधात कोणतीही कोर्टात अथवा पोलिसांमध्ये तक्रार झालेली नव्हती. त्यामुळे शरद पवार यांच्यावर कोणतीही त्याबाबत कायदेशीर कारवाई झाली नाही.
मलिकांवरचे आरोप
नवाब मलिक यांची केस मात्र याबाबत वेगळी आहे. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिने आपल्या मृत्यूपूर्वी ज्याला पॉवरा ऑफ ॲटर्नी दिली आहे त्या सलीम पटेल यांच्याकडून गोवावाला कंपाऊंड मध्ये जमीन खरेदी केली आहे. दुसरा यातला दुसरा विक्रीदार हा सरदार शहा वली खान हा आहे. या शहा वलीवर बॉम्बे असल्याचा थेट आरोप आहे
आणि त्याबद्दल त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. जमीन विक्री झाली. तेव्हा तो पॅरोलवर सुटला होता. या दोघांनी गोवाला कंपाऊंड मधली जमीन नवाब मालिक यांना विकल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीचे वकील अनिल सिंह यांनी कोर्टात सांगितले.
या सर्वांचा अर्थ हा की शरद पवार यांच्या वरचे झालेले आरोप हे राजकीय परसेप्शन मधून करण्यात आले होते. मात्र त्याबद्दल कोर्टामध्ये कोणतीही तक्रार त्या वेळी दाखल करण्यात आली नव्हती. नवाब मलिक यांच्याबाबत मात्र जमीन व्यवहार तसेच बॉम्बस्फोटाची आरोपीकडून जमीन खरेदी शिवाय त्यात मनी लॉन्ड्रिंग असे तिहेरी आहेत. नवाब मलिक यांना अटक केली आहे तसेच कोर्टाने त्यांना कोठडी देखील सुनावली आहे हा शरद पवार यांचा दाऊदशी असलेला संबंध आणि नवाब मलिक यांचा दृश्य असलेला संबंध हा यातला महत्त्वाचा फरक आहे.
गोवावाला कंपाऊंडमधील मूळ जमीन मुनिरा आणि मरियम यांच्या पालकांची होती. तिची मूळ किंमत 3 कोटी 30 लाख रुपये होती. प्रत्यक्षात फक्त 55 लाख रुपये दिले गेले. हा व्यवहार हसीना पारकर नाही ज्याला पॉवर ऑफ ॲटर्नी दिली त्या सलीम पटेल मार्फत करण्यात आली. मूळ जमीन मालकाला यातला एकही रुपया देण्यात आला नाही. मुनीराने ही माहिती ईडीला दिली आहे.
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान याच्याकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदी.
कुर्ल्यातील मोक्याची 3 एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
30 लाखांतील जमीन खरेदीपैकी 20 लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीने 2005 मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप
2005 मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव 2053 रुपये स्क्वेअर फूट होता. मात्र मलिकांनी खरेदी 25 रुपये स्वेअर फुटांनी केली.
जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, ही पॉवर ऑफ अॅटरणे हसीना पारकर नेत्याच्या नावावर केली होती. विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App